लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाला रोखण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्याच्या सर्व सिमा बंद आहेत. त्याठिकाणी तयार करण्यात आलेल्या चेकपोस्टवर ये-जा करणाºयांच्या नोंदी रजिष्टरमध्ये घेण्यासाठी तद्तवच जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून होणाºया धान्य वाटपावर लक्ष ठेवण्यासाठी एकूण १४५३ शिक्षकांची ‘ड्यूटी’ लावण्यात आलेली आहे. याशिवाय महानगरांमधून गावी परतलेल्या मजूरांमुळे सद्य:स्थितीत ३९० शाळा गुंतलेल्या आहेत. यामुळे येत्या १५ जूनपासून नवे शैक्षणिक सत्र सुरू होण्याची कुठलीच शक्यता नसून यासंबंधीचा अहवाल जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकाºयांनी वरिष्ठांकडे सादर केला आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे ‘न भुतो, न भविष्यती’ असे संकट उभे ठाकले आहे. या विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी गेल्या ६७ दिवसांपासून सर्वत्र ‘लॉकडाऊन’ लावण्यात आला; मात्र ‘नॉन ग्रीन झोन’मध्ये समाविष्ट वाशिम जिल्ह्याला त्यातून बहुतांशी शिथिलता मिळाली असून बरेच व्यवहार पुर्वपदावर आले आहेत. असे असले तरी शिक्षण व्यवस्था पुर्वपदावर येण्यासाठी आणखी बराच वेळ लागणार आहे. जिल्ह्यात शिक्षण विभागाच्या अखत्यारित असलेल्या १३८५ शाळा आहेत. त्यात इयत्ता १ ते १२ वीचे २ लाख ५२ हजार ९३८ विद्यार्थी शिक्षण घेतात. ८ हजार ८२९ शिक्षक या शाळांवर कार्यरत आहेत. दरम्यान, जिल्ह्याच्या सिमांवर आणि स्वस्त धान्य दुकानांमध्ये १ हजार ४५३ शिक्षकांची ‘ड्यूटी’ लावण्यात आलेली आहे. तसेच महानगरांमधून गावी परतलेल्या नागरिकांना थेट गावात प्रवेश न देता त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘क्वारंटीन’ केले जात आहे. अशा जिल्ह्यातील ३९० शाळा अद्याप गुंतलेल्या आहेत. यापुढेही गावी परतणाºया मजूरांना शाळांमध्येच ठेवावे लागणार असल्याने १५ जूनपासून शैक्षणिक सत्र सुरू होणे अशक्य असल्याचे शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले.
१,४५३ शिक्षकांची चेकपोस्ट, स्वस्त धान्य दुकानांवर ‘ड्यूटी’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 4:20 PM