मंगरुळपीर तालुक्यातील ख्यातीप्राप्त तीर्थक्षेत्र सावरगाव येथे मागील १४७ वर्षापासून नियमित रूपाने एकनाथी भागवत सप्ताह, अखंड हरिनाम, प्रवचन कीर्तन, काकडा व इतरही धार्मिक विधी सप्ताहादरम्यान होत असतात.
तीर्थक्षेत्र सावरगाव येथील कानिफनाथ महाराजांच्या यात्रेला वाशिम जिल्हातीलच नव्हे तर विदर्भातील इतरही जिल्ह्यातील श्रद्धाळू आणि भाविक भक्तांची मोठी गर्दी करतात. महाप्रसाद आणि यात्रा होळी दरम्यान होत असते.
श्रीक्षेत्र सावरगाव येथे कानिफनाथ महाराजांचे अनेक शतकांपूर्वी बांधलेले मंदिर असून निसर्गरम्य परिसरात उभारण्यात आलेल्या या नाथपंथीय देवसस्थानात १९ तारखेपासून २७ मार्चपर्यंत होणारे सर्व धार्मिक कार्यक्रम शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे अधीन राहून भक्तगणांच्या आरोग्य हितासाठी रद्द करण्यात येत असल्याची माहिती विश्वस्त राजेंद्र पाटील राऊत यांनी दिली