वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शासकीय, निमशासकीय, महामंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवरदेखील मर्यादा आल्या आहेत. एस.टी. आगारात केवळ १५ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती असणे आवश्यक असताना, चालक व वाहकांचा अपवाद वगळता उर्वरीत कर्मचारी ३० ते ४० टक्क्यांपेक्षा अधिक संख्येने उपस्थित राहत असल्याचे दिसून येते.
राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संचारबंदी लागू केली असून, शासकीय, निमशासकीय यासह विविध महामंडळांच्या कार्यालयांत कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीवर मर्यादा आली आहे. एस. टी. आगारात १५ टक्के उपस्थितीचे बंधन आहे. जिल्ह्यात वाशिम, कारंजा, मंगरूळपीर व रिसोड असे चार आगार असून चालक ४०९ तर वाहनांची संख्या ३६७ आहे. कोरोनामुळे प्रवासी संख्येवर मर्यादा तसेच प्रवासीदेखील मिळत नसल्याने अनेक बसफेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. कार्यालयीन उपस्थिती १५ टक्के असावी, या नियमाची अंमलबजावणी चालक व वाहकांच्या बाबतीत होत असून, यांत्रिकी कर्मचाऱ्यांची उपस्थिती काही आगारात ५० टक्के तर काही ठिकाणी ४० टक्के राहत असल्याचे दिसून येते. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन उपस्थितीचे बंधन पाळणे आवश्यक ठरत आहे.
००००००
चालक-वाहक सोडले तर बाकी ५० टक्के
जिल्ह्यातील आगारामध्ये चालक व वाहकांची उपस्थिती १५ टक्के ठेवण्यात येत आहे. मात्र, अन्य कर्मचारी हे ५० टक्क्यांपेक्षा अधिक संख्येने उपस्थित राहत असल्याने या नियमाची अंमलबजावणी होणे गरजेचे झाले आहे.
०००
नियमाचे पालन
कारंजा आगारात मी वाहक असून, चालक व वाहकांना मर्यादित संख्येत बोलाविण्यात येते. लॉकडाऊन हजेरी देण्यात येते. कोरोनाविषयक नियमांचे पालन केले जाते.
- रितेश बाबरे, वाहक
००००
वाशिम आगारात वाहक व चालकांकडून कोरोनाविषयक नियमांचे पालन केले जात असून, चालक व वाहकांची उपस्थिती १५ टक्क्यांपेक्षा कमी राहत आहे.
- राजेश कोंडाणे
00000
वाशिम आगारात कर्मचाऱ्यांची १५ टक्के उपस्थिती ठेवण्याच्या नियमाचे पालन केले जात आहे. कोरोनाविषयक नियमाची अंमलबजावणी केली जाते.
- विनोद इलामे
आगारप्रमुख, वाशिम
०००००००००
जिल्ह्यातील एकूण आगार
०४
अधिकारी ८
चालक ४०९
वाहक ३६७
यांत्रिकी कर्मचारी ११९
प्रशासकीय अधिकारी ७७
०००००००००००००