शिरपूर जैन: तीर्थक्षेत्र क गटात समाविष्ट असलेल्या शिरपूर जैन येथे तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत १५ कोटींचा निधी प्राप्त झाला असून, या निधीतून गावात विविध विकास कामे करण्यात येणार आहेत. जैन बांधवांची काशी म्हणून ओळखल्या जाणाºया शिरपूर जैन येथे जगप्रसिद्ध अंतरिक्ष पार्श्वनाथ संस्थान, जानगीर महाराज संस्थान, हजरत मिर्झा मियॉ दर्गाह, विश्वकर्मा मंदीर, खंडोबा व लकडोबा, तसेच नागनाथ, अशी विविध मंदिरे आहेत. त्यामुळे वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन येथे सुरूच असते आणि यानिमित्त वर्षाकाठी ५ लाखांवर भाविकांचे येथून आवागमन सुरू असते. येथे येणाºया भाविकांची संख्या लक्षात घेता. विविध सोयीसुविधा आणि सुसज्ज, प्रशस्त रस्ते येथे आवश्यक आहेत; परंतु स्थिती अगदी त्या विपरित असून, रस्ते अरुंद आणि उबडखाबड आहेत. नाल्यांचे सांडपाणी वाहून जाण्याची नीट व्यवस्था नाही. त्यामुळे या तीर्थक्षेत्राचा विकास करणे आवश्यक होते. या तीर्थक्षेत्राच्या विकासाचा आराखडाही पूर्वीच तयार करण्यात आला; परंतु या आराखड्यानुसार विकास कामे करण्यासाठी अपेक्षीत निधी मिळत नव्हता. त्यामुळे माजी आमदार दिवंगत सुभाष झनक, विद्यमान आमदार सुभाष झनक, तसेच माजी सभापती डॉ. शाम गाभणे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यांना यशही आले आणि आता या तीर्थक्षेत्राच्या १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून गावातील मुख्य रस्त्यांसह लहान रस्त्यांचा विकास करण्यात येणार आहे.
शिरपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी १५ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 2:02 PM
शिरपूर जैन: तीर्थक्षेत्र क गटात समाविष्ट असलेल्या शिरपूर जैन येथे तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत १५ कोटींचा निधी प्राप्त झाला असून, या निधीतून गावात विविध विकास कामे करण्यात येणार आहेत.
ठळक मुद्देविविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन येथे सुरूच असते आणि यानिमित्त वर्षाकाठी ५ लाखांवर भाविकांचे येथून आवागमन सुरू असते. भाविकांची संख्या लक्षात घेता. विविध सोयीसुविधा आणि सुसज्ज, प्रशस्त रस्ते येथे आवश्यक आहेत. आता या तीर्थक्षेत्राच्या १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.