लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व अनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून आठवीपर्यंत शिक्षण घेणाºया १ लाख ५३ हजार विद्यार्थ्यांपैकी सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी, २६ जून रोजी मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा २६ जूनपासून सुरू झाल्या. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने विद्यार्थी संख्येनुसार ७ लाख ६० हजार ५८६ पाठ्यपुस्तकांची मागणी शासनाकडे नोंदविली होती. ती शाळा सुरू होण्यापूर्वी प्राप्त झाली. प्राथमिक शिक्षण विभागाने चोख नियोजन करून ही पुस्तके सहाही तालुक्यांमधील पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाºयांमार्फत शाळांपर्यंत पोहचविण्याची कामगिरी पार पाडल्याने शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थित झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वितरण करणे शक्य झाले.
वाशिम जिल्ह्यातील दीड लाख विद्यार्थ्यांना मिळाली मोफत पाठ्यपुस्तके!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 1:59 PM