जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले असून, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे चित्र आहे. शनिवारी नव्याने ८ रुग्ण आढळून आले तर, १५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. वाशिम व मंगरुळपीर तालु्क्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात ४१,६०९ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४०,९०४ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर, आतापर्यंत ६२२ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
००००
दोन तालुके निरंक
शनिवारच्या अहवालानुसार, वाशिम व मंगरुळपीर या दोन तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम शहरात रुग्ण आढळून आले नसल्याने शहरवासीयांना मोठा दिलासा मिळत आहे. मालेगाव शहरात दोन तर तालुक्यात दोन, रिसोड शहरात दोन, कारंजा शहरात एक आणि मानोरा तालुक्यात एक रुग्ण आढळून आला.
०००००००
८२ सक्रिय रुग्ण
शनिवारच्या अहवालानुसार, नव्याने ८ रुग्ण आढळून आले तर १५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण ८२ रुग्ण सक्रिय आहेत.