मालेगाव, दि. 0३- मालेगाव शहरातील श्री स्वामी सर्मथ मंदिरात २ फेब्रुवारीच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी १५ हजार रुपयाचा ऐवज लंपास केला.मंदिराचे चॅनल गेट तोडून चोरट्यांनी मंदिराचे व नंतर दानपेटिचे कुलुप तोडले. त्यामधून चांदीच्या पादुका व दानपेटितील १0 हजार असा ऐवज लंपास केला. याबाबत लक्ष्मण उकंडा राऊत यांनी मालेगाव पोलीसात फिर्याद दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.
मालेगावच्या स्वामी सर्मथ मंदिरात १५ हजारांची चोरी
By admin | Published: February 04, 2017 1:43 AM