कारंजा लाड : महानायक वसंतरावजी नाईक यांच्या गौरव दिनाचे औचित्य साधून डॉ.महेश चव्हाण आरोग्य जनसंपर्क मिञमंडळावतीने रामनगर ग्राम पंचायत येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर ५ डिसेंबर रोजी पार पडले. या शिबिरात १५० रूग्णांची आरोग्य तपासणी मोफत करून शिबिरामधील ३२ रूग्णाची मोतीबिंदुची शस्त्रकिया मोफत करण्यात येणार असल्याची माहीती डॉ महेश चव्हान यांनी दिली.
गोरगरीबाना आरोग्याची सुविधा मिळावी व त्यांच्यावर उपचार व्हावे याकरीता गावो गावी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन डॉ.महेश चव्हाण आरोग्य जनसंपर्क मिञमंडळाच्या वतीने करण्यात येत आहे. त्याहेतुने कारंजा तालुक्यातील रामनगर व परीसरातील गावक-यासाठी निशुल्क आरोग्य तपासणी शिबीर पार पडले. मोतीबिंदू करण्यात येणाºया ३२ रूग्णांची आर्थिक परीस्थिती हालाखीची असल्याने शस्त्रकीया निशुल्क करण्यात येणार असल्याचे डॉ. चव्हाण यांनी शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात जाहीर केले. शिबीरा रूग्णांची तपासणी डॉ महेश चव्हान, डॉ स्नेहलता चव्हान, डॉ शिवाजी खेमनार, डॉ बी.के.शिंदे, डॉ केशव पवार, डॉ.बि.एस.राठोड यांनी केली. आरोग्य तपासणी शिबिराला गावातील प्रतिष्ठित नागरिक मेरिचंद गुरूजी सरपंच सो.निशा रामराव चव्हाण, उपसरपंच साहेबराव चैधरी, अमरसिंग नायक नाईक महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भीमराव चव्हाण, पोलिस पाटिल सुयकांत जाधव ग्राम पंचायत सचिव बलदेव चव्हाण, रामराव चव्हाण, रमेश देशमुख, दिलिप पवार.सुफलकर, अहुजा मॅडम, ठाकरे तसेच गावातील युवा वगार्नी सहकार्य केले.