वाशिम, दि १४ : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर आखण्यात आलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ग्रामीण भागात तयार करण्यात येणार्या रस्त्यांचा दर्जा उत्तम राखण्यासाठी सर्वंकष प्रयत्न होत आहेत. याअंतर्गत २0१६-१७ या आर्थिक वर्षात १६0 किलोमीटर अंतराचे रस्ते तयार करण्याची बाब प्रस्तावित असल्याची माहिती कार्यकारी अभियंता व्ही.डब्ल्यू. घनोकार यांनी दिली.या योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यात सन २0१५-१६ मध्ये ६३.९५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांना प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यातील रस्त्यांची कामे बहुतांशी पूर्ण झाली असून, सन २0१६-१७ मध्ये याच माध्यमातून १६0.२३ किलोमीटर लांबीचे १९ रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत, या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध होताच कामे सुरू करणार असल्याची माहिती घनोकार यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली.
१६0 किलोमीटरचे रस्ते प्रस्तावित!
By admin | Published: August 15, 2016 2:18 AM