पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार शेंदूरजना आढाव येथे अवैध गुटखा विक्री करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार १४ जुलैला पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. बाळू शिवचरण गिरी (वय ५०, रा. धानोरा) याच्याकडे १५६० रुपये किमतीचा, गोकुळ कनीराम जाधव (३२, रा. शेंदुरजना) याच्याकडे १०,४८७ रुपये किमतीचा, तर सुरेश गोबरा आडे (५५, रा. शेंदुरजना याच्याकडे ४४१७ रुपये किमतीचा मिळून एकूण १६,४६४ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. या प्रकरणी आसेगाव पोलिसांनी राजकुमार कोकडवार अन्न व सुरक्षा अधिकारी अकोला यांच्या फिर्यादीवरून तिन्ही आरोपींवर कलम १८८, २७२, २७३, ३२८, तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर खंडार करीत आहेत.
शेंदूरजना येथून १६ हजारांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 4:31 AM