प्रा. नंदलाल पवार । लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर: स्थानिक नगर पालिकेच्या अखत्यारीतील व्यापारी संकुलातील ४६ गाळेधारकांकडे पावणे दोन लाख रुपयांहून अधिक भाडे थकित आहे. त्याशिवाय या संकुलाशेजारी असलेल्या २0 भुखंड लीजधारंकाकडे ९0 हजार रुपये भाडे थकित असून, या प्रकरणी पालिकेच्यावतीने सर्वच थकितदारांना भाडे भरण्याबाबतचे सूचना पत्र पाठविले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्यात येणार असल्याने काही आजीमाजी नगरसेवकांसह गाळेधारक व अधिकार्यांवर कारवाईची शक्यता आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील नगर पालिकेच्या व्यापारी संकुलातील ४७ पैकी ४६ गाळेधारकांकडे एप्रिल, ते जून असे तीन महिन्यांचे १,७५, ९७२ रुपये भाडे, तर २0 भूखंड धारकांकडे ९0, १५0 रुपये भाडे थकित आहे. या प्रकरणी पालिका प्रशासनाने व्यापारी संकुलातील गाळेधारक व शेजारील भूखंड धारकांचा करार संपल्याने गाळे व भुखंड खाली करुन थकित भाडे भरण्याची सुचनापत्रे पाठविली आहेत. दरम्यान, याच प्रकरणी नियमबाह्य कृती करून पालिकेचे आर्थिक नुकसान केल्यावरुन अनेक आजीमाजी नगरसेवकांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. त्याशिवाय आजी माजी अधिकार्यांनी कर्तव्यात कसूर करून पालिकेचे आर्थिक नुकसान करुन केले का, याची चौकशी करण्यासह कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. नव्याने या व्यापारी संकुलाचा जाहीर लिलाव करुन नगर पालिकेची आíथक सक्षमता वाढविण्याची मागणी सुशिक्षीत बेरोजगार करीत आहेत. पालिका प्रशासनाच्या सूचनापत्रानुसार भाडे थकित असलेल्या गाळेधारकांमध्ये सुनिल श्रृंगारे, रामराव सुर्वे, प्रभाकर देशपांडे, महादेव लाडके, पंकज मेहता, गणेश जाधव,जयंत कुळकर्णी, संजय हेडा, दिपक गुल्हाणे, प्रविण देशमुख, विनोद भन्साली, विनोद परळीकर, चंद्रशेखर भोजणे, ओमप्रकाश उत्तरवार, मनिष भुतडा, विवेक नाकाडे, भगीरथ गट्टाणी, शाम भुतडा, रवि मोयल, रामदास उत्तरवार, भिमराव अवगण, दिपक मेहता, नंदकिशोर बजाज, महेंद्र भिमाणी, छाया गावंडे, योगेश तापडीया, डिगांबर सुर्वे, प्रदीप नानोटे, सुखदेव भगत, जयंत जोगी, मनोज इंगोले, ओमप्रकाश बंग, उल्हास व्यवहारे, आत्माराम खिराडे, भंवरीलाल बाहेती, राजेश जाखोटीया, सत्यनारायण बंग, नारायण मोयल, शिवाजी गेंड, डिगांबर दळवी, आदिंचा समावेश आहे.
भूखंडधारकही कारवाईच्या घेर्यात पालिकेच्या संकुलाजवळील भूखंड २0 व्यावसायिकांनी लीजवर घेतले आहेत.यामधील काहींनी भूखंड विकसीत करून पोटभाडेकरुंना भाडेतत्त्वावर दिले आहे. त्यापोटी पोटभाडेकरूकडून त्यांनी मोठय़ा प्रमाणात अनामत रक्कमही वसुल केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामध्ये भिमराव साखरे, शामराव पाटील, परशराम पेंढारकर, विजय सोनोने, दादाराव भेंडेकर, सुभाष फुके, सुरेश लहाने, विलास ठाकरे, संजय मेहता, मनोज व्यवहारे, बबन भेंडेकर, सुखदेव फुके, रामेश्वर ठाकरे, सुभाष फुके, अ.रशिद अ.काशीद, बळीराम भेंडेकर, घनशाम असावा, साहेबराव ठाकरे, प्रकाश आसरे, रतनलाल बियाणी यांचा समावेश असून,त्यामुळे या प्रकरणीही पालिका प्रशासनाकडून चौकशी करून कारवाई होण्याची शक्यता आहे.