वाशिम: जिल्हाभरात ग्रामपातळीवर प्रशासकीय कामकाज सांभाळणाºया ग्रामसेवकांच्या रिक्त पदांमुळे शेतकरी, ग्रामस्थांना अडचणी येत आहेत. जिल्हाभरात १८ ग्रामपंचायतीत ग्रामसेवकांची पदे रिक्त असून, ही पदे भरण्याची मागणी होत आहे.
----------
ग्रामस्तरीय समित्यांना मार्गदर्शन
वाशिम: जिल्ह्यात वाढत असलेला कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्रामस्तर समितीची स्थापना करण्यात आली आहे. या ग्रामसमित्यांना त्यांच्या जबाबदारीबाबत शुक्रवारपासून प्रशासनाने मार्गदर्शन सुरू केले आहे.
--------------------
उपबाजारांची अवस्था वाईट
वाशिम: जिल्ह्यातील पाच कृषी उत्पन्न बाजार समित्यांतर्गत येणाºया पाच उपबाजारांपैकी ३ उपबाजारांची अवस्था वाईट आहे. या ठिकाणी सुविधांचा अभाव असल्याने शेतमाल विक्रीस येणाºया शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
-----------------
पोहरादेवीत आरोग्य तपासणी
पोहरादेवी: गेल्या १५ दिवसांपासून पोहरादेवीत कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर संदिग्ध रुग्णांची चाचणी करून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ग्रामस्थांची तपासणी केली जात आहे. यात शुक्रवारी ४५ ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली.