लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात शहरांसह ग्रामीण भागातही कोरोनाचा कहर सुरूच असून, शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार एकूण १८ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. आता एकूण रुग्णसंख्या २०५ वर पोहचली असून, यापैकी ९५ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. दरम्यान, पाच जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.जून महिन्याप्रमाणेच जिल्ह्यात जुलै महिन्यातही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते. शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार त्यात आणखी १८ जणांची भर पडली. हिवरा रोहिला ता. वाशिम येथील सहा, कारंजा लाड येथील सहा, मंगरूळपीर शहरातील संभाजी नगर परिसरातील दोन, पंचशील नगर परिसरातील एक, शहापूर परिसरातील एक व गवळीपुरा परिसरातील एक असे एकूण पाच आणि कामरगाव (ता. कारंजा) येथील एक अशा एकूण १८ जणांचा समावेश आहे. आता एकूण रुग्णसंख्या २०५ अशी झाली असून, यामध्ये जिल्ह्यात उपचार घेणारे १९० तर जिल्ह्याबाहेर उपचार घेणाºया १५ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत १०५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील ९९ तर जिल्ह्याबाहेर उपचार घेणाºया सहा जणांचा समावेश आहे. एकूण पाच जणांचा मृत्यू झाला.
वाशिम जिल्ह्यात आणखी १८ कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या २०५
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 6:47 PM