शासनातर्फे समाजकल्याण कार्यालय, वाशिमकडे अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेंतर्गत सन २०२०-२१ करिता वाशिम जिल्ह्याला १५ कोटी २७ लाख १९ हजार एवढी रक्कम मंजूर झाली आहे. त्यात २०११ च्या अनुसूचित जातीच्या लोकसंख्येनुसार मालेगाव नगरपंचायतला १ कोटी ८१ लाख ५८ हजार ७८२ रुपये मंजूर झाले आहेत. आता या मंजूर रकमेतून केल्या जाणाऱ्या कामाबाबतचे प्रस्ताव नगरपंचायतने तत्काळ सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासन अधिकारी नगर विकास यांनी नगरपंचायत प्रशासनाला दिले असल्याचे ते म्हणाले. मालेगाव शहरातील नगरपंचायतला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेंतर्गत मंजूर झालेल्या रकमेमुळे आता शहरातील दलित वस्तीत सुधारणाची कामे होणार असल्याचेही संतोष जोशी यांनी सांगितले.
कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेसाठी पाठपुरावा
मालेगाव शहरातील नागरिकांची पाणीटंचाई समस्या लक्षात घेता शहरातील कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना ही तातडीने मार्गी लागावी, यासाठी नगराध्यक्षा रेखा अरुण बळी यांच्यासह नगरसेवकांचा पाठपुरावा सुरू असल्याचे संतोष जोशी यांनी सांगितले.