लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी जिल्ह्यातील १ हजार १८२ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. याकरिता ५९३ कोटी ५५ लाख रुपये मोबदला वितरीत करण्यात आला आहे. समृद्धी महामार्गाच्या कामांशी सांगड घालून मृद व जलसंधारणाची कामेही केली जात आहेत.राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग वाशिम जिल्ह्यातील ५५ गावांतून जात असून, जिल्ह्यातील या महामार्गाचे अंतर ९७.२३३ किलोमीटर असणार आहे. कारंजा तालुक्यातील दोनद बुद्रूक या गावातून वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गाची सुरुवात होणार असून, रिसोड तालुक्यातील केनवड येथे संपणार आहे. या महामार्गावर कारंजा तालुक्यातील २३ मंगरुळपीर तालुक्यातील १०, मालेगाव तालुक्यातील २१ आणि रिसोड तालुक्यातील एक गाव येणार आहे. या महामार्गासाठी संबंधित गावातील शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यास दोन वर्षांपूर्वी प्रारंभ करण्यात आला आणि आज रोजी जिल्ह्यातील १ हजार १८२ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. या जमीनीसाठी शेतकऱ्यांना ५९३ कोटी ५५ लाख रुपये मोबदला वितरीत करण्यात आला आहे. समृद्धी महामार्गाच्या कामांशी सांगड घालून मृद व जलसंधारणाची कामेही केली जात आहेत. त्यामुळे शेतकºयांना दुहेरी फायदा मिळणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी या संदर्भात १५ आॅगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात माहिती दिली. समृद्धी महामार्गासाठी पहिल्या टप्प्यात ८९० कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या निधीतून लँड पुलिंग योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यातील जमिनींची खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली. वाशिम जिल्ह्यातील गावे समृद्धी महामार्ग पॅकेज दोन अंतर्गत येत असल्याने जमिनींची वेगात खरेदी करणे आवश्यक होते. ही प्रक्रिया अनेक अडथळ्यानंतर सुरू झाली आणि या महामार्गाच्या कामाला सुरुवातही झाली.सुरुवातीला वाशिम जिल्ह्यात लँण्डपुलिंगअंतर्गत जमीन अधिग्रहणाला शेतकºयांचा प्रचंड विरोध होता; परंतु मार्च २०१७ च्या मुख्यमंत्र्यांनी अमरावती येथील आढावा सभेत तिप्पट मोबदल्याचा प्रस्ताव ठेवल्यानंतर शेतकºयांनी या प्रस्तावाचे स्वागत केले आणि मिळणाºया मोबदल्याबाबत बहुतांश शेतकºयांनी समाधानही व्यक्त केले.
मोबदल्याबाबत काही शेतकरी निराशवाशिम जिल्ह्यात लँण्डपुलिंगअंतर्गत जमीन अधिग्रहणाला शेतकºयांचा प्रचंड विरोध होता; परंतु मार्च २०१७ च्या मुख्यमंत्र्यांनी अमरावती येथील आढावा सभेत तिप्पट मोबदल्याचा प्रस्ताव ठेवल्यानंतर शेतकºयांनी या प्रस्तावाचे स्वागत केले आणि मिळणाºया मोबदल्याबाबत बहुतांश शेतकºयांनी समाधानही व्यक्त केले. तथापि, अद्याप विविध कारणांमुळे काही शेतकºयांचा मोबदला प्रलंबित असतानाच या मार्गासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया पार पडल्यानंतरही शासनाकडून मिळालेल्या मोबदल्याबाबत काही शेतकरी निराश आहेत. त्यामुळेच काही शेतकºयांनी या महिन्याच्या सुरुवातीपर्यंतही जमिनीचा ताबा सोडला नव्हता.