०००
कडक निर्बंधामुळे बांधकामांना ब्रेक
वाशिम : जिल्ह्यात कडक निर्बंध लागू असल्याने शौचालयांच्या बांधकामांना ब्रेक लागत असल्याचे दिसून येते. रेतीसह आवश्यक ते साहित्य उपलब्ध होत नाही तसेच बांधकाम कामगारही कामावर येत नसल्याचे दिसून येते.
००
कोरोनामुळे अतिक्रमणाचे सर्वेक्षण रखडले
वाशिम : तालुक्यातील ग्रामीण भागात गायरान जमिनींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. अतिक्रमणाचे सर्वेक्षण होणे अपेक्षित होते. परंतु, कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव असल्याने सर्वेक्षणही रखडत असल्याचे दिसून येते. सर्वेक्षण केव्हा होणार? याकडे लक्ष लागून आहे.
000000000000000
लाभार्थींची नावे शिधापत्रिकेत समाविष्ट
वाशिम : मालेगाव तालुक्यातील जवळपास १०० लाभार्थींची नावे शिधापत्रिकांमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आली आहेत. मात्र, या लाभार्थींना रेशनवर धान्य मिळत नसल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देणे अपेक्षित आहे.
००००००००
हातपंप बंद; ग्रामस्थांची गैरसोय
वाशिम : रिसोड ते वाशिम मार्गावरील घोटा, बेलखेडा फाटा येथील हातपंप गेल्या काही दिवसांपासून बंद पडल्याने प्रवाशांची पाण्यासंदर्भात गैरसोय होत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने हातपंपाची दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे.
००
देयके अदा करण्याचे आवाहन
वाशिम : जिल्ह्यातील ६३ हजारांवर वीज ग्राहकांकडे ४१ कोटींपेक्षा अधिक रकमेची थकबाकी असल्याने महावितरण आर्थिक अडचणीत सापडले आहे. ही बाब लक्षात घेता ग्राहकांनी देयके अदा करावीत, असे आवाहन कार्यकारी अभियंता आर. जे. तायडे यांनी केले.
००
जऊळका येथे आरोग्य तपासणी
वाशिम : मालेगाव तालुक्यातील जऊळका येथे आणखी तीनजणांचा कोरोना चाचणी अहवाल २० मे रोजी पॉझिटिव्ह आला. कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील संदिग्ध रुग्णांची तपासणी आरोग्य विभागातर्फे करण्यात आली.
०००
मास्कप्रकरणी न. प. तर्फे कारवाई मोहीम
वाशिम : शहरातील प्रत्येक नागरिकाने घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा, असे आवाहन नगर परिषद प्रशासनाने गुरुवारी केले. मास्कचा वापर न केल्यास दंडात्मक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
०००००००००
शेलूबाजार परिसरात ज्वारी बहरली (फोटो)
वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार परिसरात यंदा उन्हाळ्यात ज्वारीची पेरणी बऱ्यापैकी झाली. यामुळे जनावरांच्या चाऱ्याचीदेखील व्यवस्था होणार आहे. सिंचनाची सुविधा असणाऱ्या शेतकऱ्यांनी ज्वारीला पसंती दिली असून, सध्या ज्वारीचे पीक चांगलेच बहरले असल्याचे दिसून येते.
०००००००
पाणीपुरवठा अनियमित; नागरिक त्रस्त
वाशिम : जुने शहरातील पाणीपुरवठा अनियमित झाला आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तीन ते चार दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी या भागातील नागरिकांनी बुधवारी केली.
००००००००००
शिरपूर येथे आणखी आठ रुग्ण
वाशिम : शिरपूर येथे आणखी ८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २० मे रोजी पॉझिटिव्ह आल्याने गावकऱ्यांची चिंता वाढली आहे. गत काही दिवसांपासून शिरपूर येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य विभागही अलर्ट झाला आहे.
००००००००