जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले असून, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या देखील वाढत असल्याचे चित्र आहे. मंगळवारी नव्याने ९ रुग्ण आढळून आले तर २० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आणखी एका जणाचा मृत्यू झाल्याची नोंद मंगळवारी घेण्यात आली. मालेगाव व कारंजा शहर तसेच रिसोड, कारंजा व मानोरा तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. वाशिम तालुक्यात २, मंगरूळपीर तालुक्यात ३, मालेगाव तालुक्यात ३ रुग्ण आढळून आले. आतापर्यंत ४१,५०६ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४०,७५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंत ६२१ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्याबाहेरील २ बाधितांची नोंद झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, घराबाहेर पडताना नेहमी मास्कचा वापर करावा, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
००००
१२६ सक्रिय रुग्ण
मंगळवारच्या अहवालानुसार नव्याने ९ रुग्ण आढळून आले तर २० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृह विलगीकरणात असे एकूण १२६ रुग्ण सक्रिय आहेत.
000000000000
वाशिम शहरात एक रुग्ण
मंगळवारच्या अहवालानुसार वाशिम शहरात एक रुग्ण आढळून आला. शहरातही कमी रुग्ण आढळून येत असल्याने शहरवासीयांना मोठा दिलासा मिळत आहे. ग्रामीण भागात दुधखेडा येथे एक रुग्ण आढळून आला. मालेगाव व मंगरूळपीर तालुक्यातील ग्रामीण भागात प्रत्येकी तीन रुग्ण आढळून आले.