वाशिम : जिल्ह्यात आणखी २० जणांचा कोरोना चाचणी अहवाल १९ ऑक्टोबर रोजी पाॅझिटिव्ह आल्याने आता एकूण रुग्णसंख्या ५४०२ झाली आहे. दरम्यान ४६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सोमवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. १९ ऑक्टोबर रोजी दिवसभरात २० जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम तालुक्यातील नागठाणा येथील १, मालेगाव तालुक्यातील जऊळका येथील १, रिसोड तालुक्यातील लोणी येथील १, भापूर येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथील १, पार्डी ताड येथील ३, कारंजा लाड शहरातील मेन रोड परिसरातील १, गुरु मंदिर जवळील ३, पहाडपुरा येथील २, कामरगाव येथील ६ अशा एकूण २० जणांचा समावेश आहे. आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५४०२ वर पोहचली आहे. यापैकी ४६०८ जणांनी कोरोनावर मात केली. दरम्यान आणखी एका जणाचा मृत्यू झाल्याची नोंद सोमवारी घेण्यात आली. (प्रतिनिधी)
वाशिम जिल्ह्यात आणखी २० पाॅझिटिव्ह; ४६ कोरोनामुक्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 12:13 PM