वाशिम: सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या रोटरी क्लब आॅफ वाशिम मिडटाऊन यांच्या पुढाकाराने अमरावती विभागात १०० गरजू गरीब कुटूंबास प्रत्येकी २० हजार रुपये आर्थिक मदत केली आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील एका कुटूंबाचा समावेश आहे. वाशिम जिल्ह्यात रिसोड तालुक्यातील एकलासपूर येथील अत्यंत गरीब व आईवडील नसलेले लक्ष्मी व जीवन अव्हाड हे भाऊ बहीण दोघेच हालाखीचे जीवन जगत होते.दोघा भावंडांना वाशिम येथील रोटरीयन व सामाजिक कार्यकर्ते डॉ.राजीव अग्रवाल यांच्या पाठपुराव्यावरुन रोटरी क्लब आॅफ अमरावती मिडटाऊन व डिम्स फाउंडेशनने घरगुती साहित्य घेऊन दिले. एकलासपूर येथे जाऊन त्यांना घरपोच मदत दिली. यासाठी वाशिम येथील सामाजिक कार्यकर्ते तेजराव वानखेडे, अशोक अग्रवाल, डॉ.प्रशांत सावके व गावातील सरपंच पोलिस पाटील जफरु पाटील यांनी व्यसनमुक्ती बद्दल मार्गदर्शन केले. मदत मिळाल्यामुळे लाभार्थी व गावातील लोकांनी रोटरी क्लबचे अमरावती येथील अध्यक्ष राजु मुंदडा व देणगी दाता आणि इतर सर्व रोटरी सदस्यांचे आभार मानले.
अमरावती विभागातील शंभर गरीब कुटूंबांना २० हजारांची आर्थिक मदत
By admin | Published: June 15, 2017 7:38 PM