जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले असून, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे चित्र आहे. सोमवारी नव्याने १९ रुग्ण आढळून आले तर, २१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मालेगाव व मानोरा तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. वाशिम तालुक्यात १०, मंगरुळपीर तालुक्यात २, कारंजा तालुक्यात २, रिसोड तालुक्यात ३ असे रुग्ण आढळून आले. आतापर्यंत ४१,४९७ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४०,७३८ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर, आतापर्यंंत ६२० जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्याबाहेरील २ बाधितांची नोंद झाली आहे.
००००
१३८ सक्रिय रुग्ण
सोमवारच्या अहवालानुसार नव्याने १९ रुग्ण आढळून आले तर, २१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण १३८ रुग्ण सक्रिय आहेत.
000000000000
मालेगाव, मानोरा निरंक
सोमवारच्या अहवालानुसार, मालेगाव व मानोरा तालुक्यात तसेच कारंजा शहरात एकही रुग्ण आढळून आला नाही. वाशिम शहरात आठ तर ग्रामीण भागात दोन, रिसोड शहरात एक तर ग्रामीण भागात दोन रुग्ण, कारंजाच्या ग्रामीण भागात दोन रुग्ण, मंगरुळपीर शहरात व ग्रामीण भागात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला.
0000000000