लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: स्थानिक एस.एम.सी. इंग्लिश स्कूल,वाशिम येथे बृहन्मुंब्ई विज्ञान अध्यापक मंडळाद्वारे डॉ.होमीभाभा बालवैज्ञानिक परीक्षा रविवारी घेण्यात आली. एकूण २१४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.ही परिक्षा शैक्षणिकदृष्ट्या अतिशय महत्वाची असुन विद्यार्थींसाठी भविष्यातील जेईई अॅडव्हान्स व 'नीट'ची जणू पूर्व तयारीच ठरते, असे मानले जाते. सदर परिक्षा ही इयत्ता ६ वी व ९वी साठी असुन या परिक्षेला २१४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते सदर परिक्षेसाठी डॉ होमीभाभा बालवैज्ञानिक परिक्षा मंडळाचे बहिस्थ परिक्षक म्हणुन सदानंद जाधव ,केंद्रपमुख प्राचार्य मीना ऊबगडे ,केद्रसंचालक अभिजीत मुकुंदराव जोशी यांनी काम पाहिले .परीक्षा सुरळीत पार पाडन्यासाठी त्यांना प्रा.प्रणव पांडे,प्रा.किशोर चवरे ,प्रा.लखन प्यारे,प्रा.ह्रदयनाथ खंडाळेकर,प्रा.गोकुल चोपडे व सेवक नंदु महाले ,बाळू मुरेकर यांचे सहकार्य लाभले.
२१४ विद्यार्थ्यांनी दिली डॉ.होमीभाभा बाल वैज्ञानिक परीक्षा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 7:32 PM
स्थानिक एस.एम.सी. इंग्लिश स्कूल,वाशिम येथे बृहन्मुंब्ई विज्ञान अध्यापक मंडळाद्वारे डॉ.होमीभाभा बालवैज्ञानिक परीक्षा रविवारी घेण्यात आली. एकूण २१४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
ठळक मुद्देरविवारी एस.एम.सी. इंग्लिश स्कूल येथे घेण्यात आली परीक्षा परिक्षेला २१४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते