लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात यंदा २२ जूननंतर काही भागांत वारंवार अतिवृष्टी झाली. यात शेकडो हेक्टर शेत जमीन पिकांसह खरडली. तालुकास्तरावर महसूल प्रशासनाने या नुकसानाचे पंचनामे करून जिल्हास्तरावर अहवाल सादर केला. जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे २१७५ शेतकऱ्यांच्या ८४७ एकर क्षेत्रातील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने तयार केला आहे; परंतु अद्यापही शेतकºयांना या नुकसानपोटी आर्थिक मदत मंजूर झाली नाही.जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात शेतकºयांनी पेरणी केल्यानंतर सुरुवातीच्या पावसामुळे पिकांना आधार मिळाला. तथापि, २२ जूननंतर जिल्ह्यातील अनेक भागांत अतिवृष्टीने थैमान घातले. त्यात कारंजा तालुक्यातील धनज बु.सह परिसरात २२ जूननंतर अतिवृष्टीमुळे अनेक शेतकºयांच्या शेतातील पिके आणि शेतजमीनही खरडून गेली. शिवाय मालेगाव, मंगरुळपीर, मानोरा, रिसोड आणि वाशिम तालुक्यातही जूनच्या अखेर आणि जुलैच्या सुरुवातीला अतिवृष्टी होऊन शेतकºयांना मोठा फटका बसला. महसूल प्रशासनाच्यावतीने तलाठ्यांनी या नुकसानाचे पंचनामे केले आणि प्राथमिक अहवाल तहसीलस्तरावर सादर केला. त्यानंतर मंडळ अधिकाºयांनी या पंचनाम्यांच्या आधारे अंतीम अहवाल तयार करून तो तहसीलदारांमार्फत जिल्हास्तरावर पाठविला.जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापन विभागाने अहवालाचंी पडताळणी करून बाधित शेतकºयांना आर्थिक मदत देण्यासाठी विभागस्तरावर मागणी नोंदविण्यासाठी अहवाल तयार केला. तथापि, दोन महिने उलटले तरी, जिल्ह्यातील एकाही नुकसानग्रस्त शेतकºयाला अद्याप आर्थिक मदत मिळाली नाही.
शिरपूर येथे गत महिन्यात अतिवृष्टी झाली. यामुळे नाल्यास पूर येऊन आमच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. त्यामुळे खरीप हंगामात बहरलेल्या पिकांचे नुकसान झाले. आता दीड महिना उलटला तरी, प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळू शकली नाही. याची दखल वरिष्ठांनी त्वरीत घेऊन आम्हाला मदत मंजूर करावी.- राजकुमार भालेरावशेतकरी, शिरपूर जैन
शिरपूर येथे गत महिन्यात अतिवृष्टी झाली. यामुळे नाल्यास पूर येऊन आमच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. त्यामुळे खरीप हंगामात बहरलेल्या पिकांचे नुकसान झाले. आता दीड महिना उलटला तरी, प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळू शकली नाही. याची दखल वरिष्ठांनी त्वरीत घेऊन आम्हाला मदत मंजूर करावी.- राजकुमार भालेरावशेतकरी,शिरपूर जैन