वाशिम: संपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत असून त्याअतर्गत वाशिम जिल्हयातील हगणदरी मुक्त झालेल्या नऊगावांमध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची अदयावत यंत्रणा उभारण्यात येत आहे. यासाठी ६८ लाख १७ हजार ५0३ रुपयांची कामे नऊ गावांमध्ये प्रस्तावित आहेत. या नऊ गावांना प्रशासकीय मान्यता मिळालेल्या रक्कमेपैकी २२ लाख ७२ हजार ५७१ रुपयांचा ४0 टक्के निधी प्रदान करण्यात आला आहे. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठी जिल्हयातील रिसोड तालुक्यात येणारे केशवनगर, अचंळ, देगाव, कारंजा तालुक्यातील झोडगा, धानोरा, मानोरा तालुक्यातील जांबधरा, सापळी, आणि मंगरुळपीर तालुक्यातील पिंपळखुटा, आसेगाव या नऊ गावांची निवड करण्यात आली आहे. या नऊ गावांमध्ये फोरपीट गांडूळ प्रकल्प शोषखड्डे, स्थिरीकरण तळे, नॅपेड टाकी, शोषनलीका ही कामे प्राधान्याने करण्यात येत आहेत. सद्या ही कामे प्रगती पथावर असल्याचे स्वच्छ भारत अभियानातील वरिष्ठ सुत्रांनी स्पष्ट केले. केशव नगर येथील कामास सहा मार्च २0१३ पासून प्रारंभ झाला आहे. झोडगा, धानोरा, येथील कामास २८ ऑगस्ट २0१४ मध्ये प्रारंभ करण्यात आला होता. तर अंचळ, देगाव येथे २३ मार्च २0१४ मध्ये प्रारंभ करण्यात आला. मंगरुळपीर तालुक्यातील पिंपळखुटा आणि आसेगाव येथील कामांना अनुक्रमे ९ आणि १0 मार्च २0१५ रोजी सुरुवात करण्यात आली आहे. या पैकी केशवनगर येथील कामासाठी ४0 टक्के निधी आतापर्यंंंत देण्यात आला असून झोडगा धानोरा येथील कामासाठी आतापर्यंंंत ८0 टक्के निधी उपलब्ध करण्यात आला आहे. तर अंचळ देवगाव, जांबधरा, सावळी, पिं पळखुटा, आसेगाव येथील कामांसाठी ४0 टक्के निधी संबंधीत यंत्रणेला प्रदान करण्यात आला आहे. देशात स्वच्छ भारत अभियान २0१४ पासून राबविण्यात येत आहे.
घनकचरा व्यवस्थापनासाठी २२ लाखांचा निधी
By admin | Published: July 15, 2015 1:40 AM