वाशिम : मतदार संघातील मानोरा तालुक्यातील आमखिनी, वापटा, पारवा, रूई, रंजीतनगर तसेच रोहणा येथील रस्त्यांच्या दजार्वाढीसाठी मतदार संघाचे आ.राजेंद्र पाटणी यांनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वरील रस्त्यांची कामे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन करण्यासाठी मागणी केली होती. आ.पाटणी यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी वरील २५.४ कि.मी.रस्त्याच्या कामास २३ कोटी ५९ लक्ष रूपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मानोरा तालुक्यातील रामा २७३ ते आमखिनी या ११ कि.मी. रस्त्याच्या कामास ६२४.९४ लक्ष रुपए मंजुर झाले असुन कामाची ५ वर्ष नियमित देखभाल दुरूस्तीसाठी ४३.७५ लक्ष रुपए देखील मंजुर करण्यात आले आहेत. रामा २८७ ते वापटा-पारवा या ७.४० कि.मी.कामाकरिता ६३८.९८ लक्ष रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला असुन देखभाल दुरूस्तीसाठी ४४.५० लक्ष रुपए मंजुर करण्यात आले आहे. रूई ते रंजीतनगर या ८ कि.मी. रस्ता कामासाठी ६३५.७० लक्ष रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला असुन देखभाल दुरूस्तीसाठी ३२.१७ लक्ष रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. रामा २७३ ते रोहणा तालुका सिमेपर्यंतचा ६.४० रस्ता कामासाठी ४५९.६३ लक्ष रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला असुन देखभाल दुरूस्तीसाठी ३२.१७ लक्ष रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे.
याशिवाय रिसोड तालुक्यातील गोभणी ते तांदळवाडी या ३.१० कि.मी. रस्ता कामासाठी २१६.२१ लक्ष रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला. लेहणी ते भापुर या ५.१९ कि.मी.साठी २७०.९० लक्ष रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला. रामा ५१ ते मोहजा इंगोले या ३.१० कि.मी.साठी २२३.५९ लक्ष रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला. ०९ ते पेडगाव या ४.१० कि.मी.कामासाठी १३९.१३ लक्ष रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला. तसेच मंगळरूपीर तालुक्यातील मंगरूळपीर ते जांब या ५ कि.मी.साठी २११.७७ लक्ष रूपयांचा निधीमंजुर करण्यात आला.
रामा २७३ ते पिंपरी या ४.८० कि.मी.साठी २६६.६६ लक्ष रूपयांचा निधीमंजुर करण्यात आला. १२ ते पोघात या २.५० कि.मी.साठी १२४.७३ लक्ष रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला. मंगळसा ते बेलखेड या ५ कि.मी.साठी ४००.६९ लक्ष रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील मानोरा, रिसोड व मंगरूळपीर तालुक्यातील ६५.५९ कि.मी. रस्ता कामासाठी ४२१२.९३ लक्ष रुपए मंजुर झाले असुन या रस्त्यांच्या देखभाल दुरूस्तीसाठी २९४.९१ लक्ष रुपए मंजुर झाले असल्याचे माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्र पाटणी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातुन दिली आहे. वरील कामे ग्रामविकास विभागाच्या अधिनस्त असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व ग्रामविकास विभागाच्या अटी व शर्तीवर कार्यान्वीत करण्यात आली.
मानोरा, रिसोड व मंगरुळपीरसाठी ४२१३ लक्ष रुपये मंजुर
४वाशिम जिल्ह्यातील मानोरा, रिसोड व मंगरूळपीर तालुक्यातील ६५.५९ कि.मी. रस्ता कामासाठी ४२१२.९३ लक्ष रुपए मंजुर झाले. ४रिसोड तालुक्यातील गोभणी ते तांदळवाडी या ३.१० कि.मी. रस्ता कामासाठी २१६.२१ लक्ष रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला. ४ मंगळरूपीर तालुक्यातील मंगरूळपीर ते जांब या ५ कि.मी.साठी २११.७७ लक्ष रूपयांचा निधीमंजुर करण्यात आला.