वाशिम : जिल्ह्यात गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत २४ लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करून ४८ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाली.या योजनेंतर्गत विमाधारक शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी होणे किंवा एक डोळा व एक अवयव निकामी होणे, अशा तिन्ही प्रकारांमध्ये दोन लाख रुपये; तर अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाते. संबंधित खातेदार शेतकऱ्यांचा विमा हप्ता देखील राज्यशासनाकडून भरला जातो. त्यानुसार, जिल्ह्यातील २४ लाभार्थ्यांना आतापर्यंत ४८ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आल्याचे कृषी विभागाने सांगितले.
२४ लाभार्थ्यांना मिळाली ४८ लाखांची नुकसानभरपाई!
By admin | Published: May 06, 2017 7:30 PM