जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अत्यल्प झाले तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे आशादायी चित्र आहे. रविवारी नव्याने २४ रुग्ण आढळून आले तर ५७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मालेगाव शहरात एकही रुग्ण आढळून आला नाही. वाशिम तालुक्यात एक, रिसोड तालुक्यात पाच, मंगरूळपीर तालुक्यात पाच, कारंजा लाड तालुक्यात दोन आणि मानोरा तालुक्यात चार रुग्ण आढळून आला. आतापर्यंत ४१२३० रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४०२८७ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंत ६१४ जणांचे मृत्यू झाले. नागरिकांनी यापुढेही आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाने केले.
००००
३३१ सक्रिय रुग्ण
रविवारच्या अहवालानुसार नव्याने २४ रुग्ण आढळून आले तर ५७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण ३३१ रुग्ण सक्रिय आहेत.
000000000000
वाशिम शहरात एक रुग्ण
रविवारच्या अहवालानुसार जिल्ह्यात ग्रामीण भागात १३ तर शहरी भागात ११ असे २४ कोरोना रुग्ण आढळले. वाशिम शहरात एक रुग्ण आढळून आला. मानोरा शहरात एक तर ग्रामीण भागात तीन रुग्ण, कारंजा शहरात दोन, रिसोड शहरात तीन तर ग्रामीण भागात दोन रुग्ण आढळून आले.