लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात गत दोन वर्षांपासून राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) अंतर्गत पाच महामार्गांची कामे करण्यात येत आहेत. त्यातील या मार्गाच्या कामांसाठी जवळपास २४ हजार वृक्षांची कत्तल करण्यात आली. त्या बदल्यात महामार्गांचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपन्यांनी अद्याप त्यांना दिलेल्या उद्दिष्टापैकी निम्मीही झाडे लावली नाही. जिल्ह्यात वाशिम-हिंगोली, अमरावती-हिंगोली, अकोला-आर्णी, मालेगाव-मेहकर या राष्ट्रीय महामार्गांसह एक-दोन जिल्हा प्रमुख मार्गांची कामे करण्यात येत आहेत. या रस्त्यांच्या कामात अडसर निर्माण होत असल्याच्या कारणावरून शे-दीडशे वर्षांपूर्वी लागवड झालेल्या जवळपास २४ हजारांहून अधिक वृक्षांची कत्तल झाली. बदल्यात मात्र निम्मेही वृक्ष लावलेले नाहीत.
वृक्षतोड दुर्दैवीच जिल्ह्यात महामार्गाच्या कामांसाठी बेसुमार वृक्षतोड करण्यात आली. हा प्रकार पर्यावरणासाठी अत्यंत घातक आणि दुर्दैवी आहे. यामुळे प्रदूषणवाढीस वाव आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील नेमकी किती झाडे तोडण्यात आली. ती माहिती देण्यासह प्रशासनाकडून टाळाटाळ होत आहे. -गौरव इंगळे,पर्यावरण प्रेमी,
गत पाच वर्षांत ४४ लाख वृक्षांची लागवडराज्य शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यात २०१४-१५ मध्ये ११ लाख ८ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली, तर त्यानंतर राबविण्यात आलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यात ४० लाख ३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते. त्या महामार्गा पूर्ण वृक्ष लागवड झाली नाही.
जिल्ह्यात ४२ हजार हेक्टरवर जंगल जिल्ह्याचे भाैगोलिक क्षेत्र ५,१८६ चौरस किलोमीटर आहे. त्यात प्रादेशिक वन विभागाच्या वाशिम, कारंजा, मानोरा आणि मालेगाव तालुक्यातील परिक्षेत्रात मिळून ४१ हजार ९७१.६६ हेक्टर क्षेत्रावर प्रादेशिक वन विभागाचे वनपरिक्षेत्र आहे. या वनपरिक्षेत्रात विविध प्रजातींची हजारो झाडे असून, जिल्ह्यात सोहळ काळवीट अभयारण्य असले तरी ते गवताळ आणि झुडपी जंगल आहे.