लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाद्वारे आयोजित डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा स्थानिक एसएमसी इंग्लिश स्कूल या केंद्रावर ६ आॅक्टोबर रोजी २४२ विद्यार्थ्यांनी दिली.बालकांमधील ‘वैज्ञानिक’ वृत्ती शोधण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. सदर परीक्षा विद्यार्थ्यांसाठी जेईई अँडव्हान्स व नीट परीक्षेची पूर्व तयारी म्हणून ओळखली जाते. सदर परीक्षा इयत्ता सहावी व नववीतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येते . या परीक्षेला वाशिम विभागातुन विविध शाळेतून २५० विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. यापैकी २४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षेसाठी डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा मंडळाचे बहिस्थ केन्द्र समन्वयक म्हणुन भिमाशंकर गभाले, केन्द्र प्रमुख प्राचार्य मीना उबगडे व केन्द्र संचालक म्हणुन अभिजीत मुकुंदराव जोशी यांनी काम पाहिले. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षिका वर्षा पाटील, संगीता गाडे, स्नेहल राऊत, कपील शर्मा, सुनिता टांक, पायल गजरे, चंदा चव्हान तसेच सेवक किशोर वंजारी, वंदना नांदनकर यांचे सहकार्य लाभले.
वाशिम येथे २४२ विद्यार्थ्यांनी दिली बाल वैज्ञानिक परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2018 4:41 PM