लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव : आदिश्वर जैन श्वेतांबर मंदिराचा २४ वा वर्षपूर्ती सोहळा शनिवार १७ फेब्रुवारीला साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तर या कार्यक्रमाला पन्यास प्रवर परमहंस विजयजी महाराजासह मुनीश्री श्रमणहंस विजयजी महाराज यांची उपस्थिती राहणार आहे. श्वेतांबर समाजबांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थानच्यावतीने करण्यात आले. श्री तिर्थक्षेत्र शिरपूर जैनची तलेटी म्हणून मालेगाव येथील श्री आदिश्वर जैन श्वेतांबर मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिराची २४ वी वर्षगाठ १७ फेब्रुवारीलीा असून वर्षगाठ महोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्यात सकाळी ७ वाजता मंदिरात भगवान आदिश्वराच्या मुर्तीला आभिषेक करण्यात येणार आहे तर त्यानंतर स्रात्रपुजन करण्यात येईल. त्यानंतर ८ वाजता सत्तरभेदी पुजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जैनमुनी पन्यास प्रवर परमहंस विजयजी महाराज मुनी श्रमणहंस विजयजी महाराज यांच्या मार्गदर्शनात लोणार येथील विधीकारक शेखरभाई सुराणा तसेच गुलाबचंंद सुराणा हे पुजन विधी पार पाडणार आहेत, तर वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त सकाळी १०.५ मिनिटाने मंदिराच्या कळसावर प्रकाशचंद कोठारी परिवाराच्यावतीने ध्वजारोहण करण्यात येणार आहे. आदिश्वर जैन श्वेतांबर मंदिरात आयोजित या कार्यक्रमाला संस्थानचे अध्यक्ष पारस गोलेच्छा, सचिव प्रकाशचंद कोठारी, सदस्य अनिल गादिया, राजू कोठारी, शिखरचंद संचेती, मंगलचंद संचेती, हेमंत गांधी, अॅड.आशिष गोलेच्छा, जयदिप कोठारी, गणेश कोठारी, विजय गादिया, सयंम गोलेच्छा, मयंक गोलेच्छा, ऋषभ कोठारी यांच्यासह कल्पना कोठारी, माधुरी कोठारी, सुशिला गोलेच्छा, प्रिया गोलेच्छा, ज्योती गादिया, समता गांधी आदिंसह मोठ्या संख्येने श्वेतांबर जैन समाजबांधव उपस्थित राहणार आहेत.
१७ फेब्रुवारीला मालेगावच्या आदिश्वर जैन श्वेतांबर मंदिराचा २४ वा वर्षपूर्ती सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 7:38 PM
मालेगाव : आदिश्वर जैन श्वेतांबर मंदिराचा २४ वा वर्षपूर्ती सोहळा शनिवार १७ फेब्रुवारीला साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तर या कार्यक्रमाला पन्यास प्रवर परमहंस विजयजी महाराजासह मुनीश्री श्रमणहंस विजयजी महाराज यांची उपस्थिती राहणार आहे. श्वेतांबर समाजबांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थानच्यावतीने करण्यात आले.
ठळक मुद्देविविध धार्मिक कार्यक्रमपन्यास प्रवर परमहंस महाराजांची उपस्थिती