वाशिम : इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के राखीव कोट्यातून मोफत प्रवेश देणार्या जिल्ह्यातील एकाही शाळेला गेल्या तीन वर्षांपासून शुल्क परतावा मिळालेला नाही. थकीत असलेली ही रक्कम तब्बल तीन कोटी रुपये असल्याची माहिती ह्यमेस्टाह्ण संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष गडेकर यांनी शनिवारी दिली.ज्यावर्षी विद्यार्थ्यांना २५ टक्के कोट्यातून शाळेत मोफत प्रवेश देण्यात आला, त्याचवर्षी शासनाकडून शुल्क परतावा मिळणे क्रमप्राप्त आहे; मात्र शिक्षण विभागाकडून यासंदर्भात कमालीची उदासीनता बाळगली जात आहे. गडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २0१४-१५ मध्ये जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांंना २५ टक्के कोट्यातून प्रवेश देण्यात आला. त्यापोटी शासनाकडून ८0 लाख मिळणे बाकी आहे. २0१५-१६ मधील ही रक्कम एक कोटी रुपये असून, २0१६-१७ मधील १.२५ कोटी रुपये शासनाकडून घेणे बाकी आहे. सुमारे तीन कोटी रुपये रक्कम शासनाकडे थकलेली असतानाही जिल्ह्यातील संस्थाचालकांनी कुठलीच तक्रार न ठेवता विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक हित जोपासत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश दिला. तीन वर्षाच्या शुल्क परताव्याची रक्कम शासनाकडून शिक्षणाधिकार्यांच्या बँक खात्यात जमा असूनही एकाही शाळेला ती मिळालेली नाही. २५ टक्के शुल्क परताव्याच्या कागदपत्रांची पूर्तता करुनही वारंवार कागदपत्रांची मागणी केली जाते. गत दोन महिन्यांपासून संस्थाचालक शुल्क परताव्याची सातत्याने मागणी करीत असताना रक्कम मिळणे दुरापास्त झाल्याने शाळा चालविणे संस्थाचालकांना कठीण झाले आहे. तथापि, येत्या दोन दिवसात शुल्क परतावा न मिळाल्यास महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य शिक्षणाधिकारी, प्राथमिक यांचे कार्यालय व जिल्हा परिषदेवर लोकशाही पद्धतीने मोर्चा काढून आंदोलन करतील, असा इशारा मेस्टा संघटनेचे विदर्भ उपाध्यक्ष अभिजित देशमुख, जिल्हाध्यक्ष संतोष गडेकर व जिल्हा संघटक किरण चौधरी यांनी दिला आहे.जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने २५ टक्के मोफत प्रवेश शुल्क परताव्याबाबत प्रचंड उदासीनता बाळगली आहे. नियमानुसार लागणार्या १२ कागदपत्रांची पूर्तता करूनही नाहक त्रास दिला जात आहे. गत तीन वर्षांंपासून कोट्यवधी रुपयाचा निधी शिक्षणाधिकार्यांच्या खात्यात जमा असताना तो देण्यास टाळाटाळ केली जात आहे. - संतोष गडेकरजिल्हाध्यक्ष, मेस्टा संघटना, वाशिम.
२५ टक्के मोफत प्रवेश देणा-या शाळा शुल्क परताव्यापासून वंचित!
By admin | Published: April 30, 2017 2:32 AM