मध्यप्रदेशातील २५ मजुरांचा रेल्वेरुळावरून पायी प्रवास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 10:58 AM2020-04-22T10:58:08+5:302020-04-22T11:01:14+5:30

हैद्राबाद येथून मजूर कुटूंबातील लहान मुलांसह २५ जणांनी रेल्वे रुळावरूनच पायदळ प्रवास सुरू केला.

 25 laborers from Madhya Pradesh travel on foot on railway tracks! | मध्यप्रदेशातील २५ मजुरांचा रेल्वेरुळावरून पायी प्रवास!

मध्यप्रदेशातील २५ मजुरांचा रेल्वेरुळावरून पायी प्रवास!

Next
ठळक मुद्दे १५ दिवसांपूर्वी हैद्राबादवरून पायदळ प्रवासाला सुरूवात केली. हे मजूर खंडवा (मध्यप्रदेश) येथील रहिवासी आहेत.२१ एप्रिल रोजी वाशिमवरून जाताना हे मजूर दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात २५ मार्चपासून ३ मे पर्यंत लॉकडाऊन लागलेला आहे. यामुळे रेल्वे, बस यासह इतरही प्रकारची वाहतूक बंद आहे. त्याचा सर्वाधिक फटका मजूर कुटूंबांना बसत असून घरी पोहचण्यासाठी अनेकांनी पायदळ प्रवासाचा मार्ग निवडला आहे. दरम्यान, हैद्राबाद येथून मजूर कुटूंबातील लहान मुलांसह २५ जणांनी रेल्वे रुळावरूनच पायदळ प्रवास सुरू केला. २१ एप्रिल रोजी वाशिमवरून जाताना हे मजूर दिसून आले.
लोखंडी रेल्वे रुळ आणि गिट्टीवरून मजल-दरमजल करित १७ मजूरांसह त्यांच्यासोबत असलेल्या मुलांनी १५ दिवसांपूर्वी हैद्राबादवरून पायदळ प्रवासाला सुरूवात केली. हे मजूर खंडवा (मध्यप्रदेश) येथील रहिवासी आहेत. प्रवासादरम्यान दानशूर लोकांकडून खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था होत आहे.
दिवसभर पायदळ प्रवास करताना थकवा जाणवल्यास एखाद्या झाडाखाली आश्रय घ्यायचा, रात्रीच्या सुमारास एखाद्या रेल्वे स्थानकावर किंवा बाहेर कुठेही झोप घेऊन दुसऱ्या दिवशी पुढच्या प्रवासाला सुरूवात करायची, असा दिनक्रम या मजूरांचा ठरलेला आहे. दरम्यान, खंडवा येथे पोहचण्यासाठी आणखी बरेच दिवस लागणार असल्याचे या मजूरांनी सांगितले.
(प्रतिनिधी)

Web Title:  25 laborers from Madhya Pradesh travel on foot on railway tracks!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.