पोलीस अधीक्षक वसंत परदेशी व अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे यांनी तीन पथकाच्या माध्यमातून ६ ते १५ जुलै यादरम्यान जिल्ह्यात अवैधरीत्या गावठी हातभट्टीची दारू गाळणारे, विक्री करणाऱ्या इसमांविरुद्ध कारवाईची मोहीम राबविली. १६ ठिकाणी छापे मारून दोन लाख ५० हजार १७० रुपयाची गावठी हातभट्टीची दारू, सडवा मोहमाच व इतर साहित्य जप्त केले. याप्रकरणी १६ इसमांविरुद्ध जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले.
००
अवैघ धंद्यांची माहिती द्या!
जिल्ह्यात अवैध धंद्याबाबतची माहिती असल्यास स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना समक्ष भेटून अथवा फोनद्वारे माहिती द्यावी, माहिती देणाऱ्याबाबत पूर्णपणे गोपनीयता ठेवण्यात येईल, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले.