लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यातील २५२ गावांची निवड करण्यात आली असून, या गावांमध्ये ३ हजार १२३ कामे होणार आहेत. आतापर्यंत ३६२ कामे पूर्ण झाली आहेत.राज्याच्या काही भागात दर दोन वर्षांनी या-ना-त्या कारणांनी निर्माण होणाºया टंचाईवर मात करण्यासाठी राज्यात ‘जलयुक्त शिवार’ अभियान ही नाविण्यपूर्ण योजना राबविली जात आहे. अपुºया आणि अनियमित पावसामुळे टंचाई परिस्थिती निर्माण झाल्याने कृषी क्षेत्रावर त्याचा विपरित परिणाम होतो. निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असणारी ही परिस्थिती बदलण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाच्या विविध कामांवर भर दिला जात आहे. पावसाचे पाणी गावाच्या शिवारातच अडविणे, भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करणेख सिंचन क्षेत्रात वाढ करुन शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, सर्वांना पुरेसे पाणी उपलब्ध करण्याची शाश्वता निर्माण करणे, पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे, अस्तित्वात असलेले व निकामी झालेले बंधारे, गावतलाव, पाझरतलाव, सिमेंट बंधारे आदि जलस्तोत्रांची साठवण क्षमता वाढविणे, जलस्त्रोतातील गाळ लोकसहभागातून काढून पाणीसाठा वाढविणे आदींना प्राधान्य दिले जाते. जिल्ह्यात सन २०१८-१९ या वर्षात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २५२ गावांची निवड करण्यात आली आहे. २५२ गावांत जलसंधारणाची एकूण ३ हजार १२३ कामे होणार आहेत. आतापर्यंत ३६२ कामे पूर्ण झाली असून, उर्वरीत कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना कृषी विभागाने संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २५२ गावांची निवड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 4:44 PM