जिल्ह्यात अनेक गावात चिमुकल्यांच्या अंगणवाडीसाठी इमारतीची सोय नाही. काही ठिकाणी झाडाखाली अंगणवाडी भरते ही बाब लक्षात घेऊन खासदार गवळी यांनी निती आयोगाकडे अंगणवाडीसाठी निधीची मागणी केली होती. त्यांनी पाठपुरावा केल्याने निती आयोगाने जिल्ह्यातील ३० अंगणवाड्यांसाठी २.५५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. यामध्ये वाशीम तालुक्यातील सुपखेला, साखरा, आसोला जहा, तोंडगाव, मंगरूळपीर तालुक्यातील धानोरा बु.जांब, साळंबी, मानोली, कंझरा, मानोरा तालुक्यातील अजनी, तोरनाळा, देऊळवाडी, शिवनी, रणजीतनगर, चोंडी, कारंजा तालुक्यातील अंर्बोडा, मालेगाव तालुक्यातील जऊळका, डव्हा, गिव्हा कुटे, सिरसाळा. रिसोड तालुक्यातील चिंचाबा, नंधाना, तांदूळवाडी, केनवड, कोयाळी बु., तपोवन, व्याड, जायखेड, रिठद या गावांचा समावेश आहे. यामध्ये प्रतिअंगणवाडी बांधकामासाठी ८.५० लक्ष रुपये मंजूर झाले आहेत. ३० अंगणवाड्यांसाठी एकूण दाेन कोटी ५५ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
जवळ जवळ एका वर्षापासून खासदार गवळी यांनी पाठपुरावा केला होता. अखेर कामाला मंजुरी मिळाली आहे. या कामाची प्रशासकीय प्रक्रिया होऊन एक ते दीड महिन्यात कामे प्रत्यक्षात सुरू होतील. या निधीमुळे ग्रामीण भागातील चिमुकल्यांच्या डोक्यावर छत मिळणार आहे.