जिल्ह्यात अनेक गावात चिमुकल्यांच्या अंगणवाडीसाठी इमारतीची सोय नाही. काही ठिकाणी झाडाखाली अंगणवाडी भरते. ही बाब लक्षात घेऊन खासदार गवळी यांनी नीती आयोगाकडे अंगणवाडीसाठी निधीची मागणी केली होती. त्यांनी पाठपुरावा केल्याने नीती आयोगाने जिल्ह्यातील ३० अंगणवाड्यांसाठी २.५५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. यामधे वाशिम तालुक्यातील सुपखेला, साखरा, आसोला जहा, तोंडगाव, मंगरूपीर तालुक्यातील धानोरा बु. जांब, साळंबी, मानोली, कंझरा मानोरा तालुक्यातील अजनी, तोरनाळा, देऊळवाडी, शिवनी, रणजीतनगर, चोंडी, कारंजा तालुक्यातील अंर्बोडा, मालेगाव तालुक्यातील जउळका, डव्हा, गिव्हा कुटे, सिरसाळा, रिसोड तालुक्यातील चिंचाबा, नंधाना, तांदुळवाडी, केनवड, कोयाळी बु., तपोवन, व्याड, जायखेड, रिठद, या गावांचा समावेश आहे. यामध्ये प्रती अंगणवाडी बांधकामासाठी ८.५० लाख रुपये मंजूर झाले आहेत. ३० अंगणवाड्यांसाठी एकूण २ कोटी ५५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. जवळजवळ एका वर्षापासून खासदार गवळी यांनी पाठपुरावा केला होता. अखेर कामाला मंजुरी मिळाली आहे. या कामांची प्रशासकीय प्रक्रिया होऊन एक ते दीड महिन्यात कामे प्रत्यक्षात सुरू होतील. या निधीमुळे ग्रामीण भागातील चिमुकल्यांच्या डोक्यावर छत मिळणार आहे.
जिल्ह्यातील ३० अंगणवाड्यांसाठी २.५५ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 4:29 AM