वाशिम : जिल्हा परिषद व अनुदानित शाळेतील पात्र विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश देण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले. निधीचा अडथळा येऊ म्हणून शिक्षण विभागाने ६५ हजार १८२ विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी दोन कोटी ६0 लाख ७२ हजार ८00 रुपये संबंधित पंचायत समितींकडे रवाना केले आहेत. स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणात मागे पडू नये म्हणून शासन नानाविध उपक्रम अंमलात आणत आहे. वंचित, गोरगरीब व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून मदतीचा हात दिला जातो. दारिद्रय़रेषेखालील मुले, एस.सी. व एस.टी. प्रवर्गातील मुले आणि सर्व प्रवर्गातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलींना मोफत गणवेश पुरविला जातो. सर्व शिक्षा अभियानांतर्गत मिळणार्या या गणवेशासाठी प्रती विद्यार्थी प्रती दोन गणवेशासाठी ४00 रुपयांचा निधी शासनातर्फे पुरविला जातो. वाशिम जिल्ह्यात एकूण ६५ हजार १८२ विद्यार्थी गणवेशासाठी पात्र ठरले आहेत. या गणवेशासाठी दोन कोटी ६0 लाख ७२ हजार ८00 रुपये शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहेत.कारंजा तालुक्यातील ११८८२ विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी ४७ लाख ५२ हजार ८00 रुपये, मालेगाव तालुक्यातील ११९५३ विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी ४७ लाख ८१ हजार २00 रुपये, मंगरुळपीर तालुक्यात ९३१७ विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी ३७ लाख २६ हजार ८00 रुपये, मानोरा तालुक्यात ८७0४ विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी ३४ लाख ८१ हजार ६00 रुपये, रिसोड तालुक्यात १0३८७ विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी ४१ लाख ५४ हजार ८00 रुपये, वाशिम तालुक्यात १२९३९ विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी ५१ लाख ७५ हजार ६00 रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. ६५ हजार १८२ विद्यार्थ्यांंमध्ये दारिद्रय़रेषेखालील १0 हजार ९१९ विद्यार्थी, एस.सी. प्रवर्गातील ९४६६ विद्यार्थी आणि एस.टी. प्रवर्गातील ३७९0 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. उर्वरीत सर्व मुली आहेत.
गणवेशासाठी २.६0 कोटी निधी
By admin | Published: June 24, 2016 12:06 AM