वाशिम - जिह्यातील सहा कृषि उत्पन्न बाजार समितीअंतर्गत २५७ शेतकऱ्यांनी १३ हजार १८५ क्विंटल माल तारण ठेवला असून त्यापोटी २ कोटी ७५ लाख ३९ हजार २४३ रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. दरम्यान, जिल्ह्यातील केवळ २५७ शेतकºयांचा अपवाद वगळता उर्वरीत शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते.
बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक वाढली की बाजारभाव कोसळतात, हा दरवर्षीचाच अनुभव आहे. शेतकºयाला असलेल्या आर्थिक गरजेपोटी तसेच स्थानिक पातळीवर शेतमाल साठवणुकीच्या पुरेशा सुविधा नसल्यामुळे बाजार समितीत मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी येतो. यामुळे शेतमालाचे बाजारभाव खाली येतात. सदर शेतमाल साठवणूक करुन काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्यास त्या शेतमालास बºयापैकी बाजारभाव मिळू शकतो. शेतकºयांना शेतमालासाठी योग्य भाव मिळावा या दृष्टिकोनातून कृषी पणन मंडळाने सन १९९०-९१ पासून शेतमाल तारण कर्ज योजनेला सुरूवात केली. या योजनेमध्ये तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सुर्यफूल, चना, भात (धान), करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, आदी शेतमालाचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत शेतकºयांना बाजार समितीच्या गोदामात तारणात ठेवलेल्या शेतमालाच्या एकुण किंमतीच्या ७५ टक्के पर्यंत रक्कम ६ महिने कालावधीसाठी ६ टक्के व्याज दराने तारण कर्ज देण्यात येते. सदर योजना बाजार समित्यांमार्फत राबविली जात असून सहा महिन्यांचे आत तारण कर्जाची परतफेड करणाºया बाजार समित्यांना ३ टक्के व्याज सवलत देण्यात येते. शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत फक्त उत्पादक शेतकºयांचाच शेतमाल स्विकारला जातो. वाशिम जिल्ह्यात सहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामात शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात शेतमाल साठवून आर्थिक गरजा भागविण्यासाठी तारण कर्जाचा लाभ घेणे अपेक्षीत आहे. मात्र, शेतमालाचे बाजारभाव वाढण्याची कोणतीही शक्यता दिसत नसल्याने शेतकºयांनी शेतमाल तारण योजनेकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील केवळ २५७ शेतकºयांनी शेतमाल तारण योजनेंतर्गत कर्जाची उचल केली आहे.