वाशिम : सुजलाम्-सुफलाम् दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत वाशिम जिल्हयातील कारंजा, मानोरा, रिसोड, वाशिम, मालेगाव आणि मंगरूळपीर या सहा तालुक्यांमधील १२८ गावांमध्ये जलसंधारणाची एकंदरत २९७ कामे पूर्ण झाली आहेत. त्यातून २५.७७ लाख घनमिटर एवढे काम झाले असून २७.७७ लाख घनमीटर पाणीसाठा झाल्याचा दावा अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक विशाल नागनाथवार यांनी केला.वाशिम जिल्ह्यात जलसंधारण विभाग, महाराष्ट्र शासन व भारतीय जैन संघटनेच्या वतीने सुजलाम् सुफलाम् दुष्काळमुक्त महाराष्ष्ट्र अभियानांंतर्गत नाला खोलीकरण, नदी खोलीकरण व रूंदीकरण, शेततळे, सीसीटी, डीप सीसीटी, शेतांची बांध-बंदिस्ती, माती नाला बांध, गाव तलाव गाळ काढणे आदी कामे १२८ गावांमध्ये गेल्या सहा महिन्यात करण्यात आली. या कामाकरीता भारतीय जैन संघटनेकडून २८ जेसीबी व १४ पोकलन मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यातून २९७ कामे पूर्ण करण्यात आली. या कामाकरीता शासनाकडून ५३ लाख ८३३ लीटर्स डिझेल वापरण्यात आले. यामध्ये पोकलनने ३७ हजार ९४० तास काम करण्यात आले. याकरीता बिजेएसकडून पोकलन मशीन भाडे २ कोटी ९२ लाख रुपये देण्यात आले, तर जेसीबीने १५ हजार ९५१ तास काम करण्यात आले आहे. जलसंधारणाच्या कामाकरीता कृषी विभागाची १८९ कामे, तर वनविभागाची १२ कामे, जलसंपदा विभागाची १२ कामे, जलसंधारण विभागाची ४२ कामे व जिल्हा परीषद लघु सिंचन विभागाची ४२ कामे अशी एकूण २९७ कामे पूर्ण झाली आहेत.दरम्यान, पहिल्याच पावसात केलेल्या जलसंधारणाच्या कामांठिकाणी पाणीसाठा झाल्याने गावकरी आनंद व्यक्त करत आहेत. या साठलेल्या पाण्यामुळे परीसरातील विहिरच्यिां पातळीत वाढ झाली आहे. या कामाकरीता जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील प्रशासकीय यंत्रणेतील कर्मचारी व बीजेएसच्या सदस्यांनी पुढाकार घेतला, हे विशेष.
वाशिम जिल्ह्यातील १२८ गावांत जलसंधारणाची २९७ कामे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 11:56 AM