वाशिम : शेतकर्यांचे हिरवे स्वप्न साकारणारे जिल्ह्यातील ३0 सिंचन प्रकल्प सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या फेर्यातून अद्यापही बाहेर पडले नाहीत. परिणामी, सिंचन अनुशेषाचा आकडा फुगत असून, शेतकर्यांचा रबी हंगाम सिंचनाविना कोरडाच जात आहे. काळ बदलला, तसा शेती कसण्याच्या पद्धतीतही बदल होत गेला. शेतीतून अधिकाधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकर्यांकडून होत आहे. या प्रयत्नांना शासनाकडूनही सिंचन प्रकल्पांच्या स्वरुपात मूर्त रुप दिले जात आहे. सिंचनाच्या माध्यमातून हिरवे स्वप्न साकारणार्या वाशिम जिल्ह्यातील शेतकर्यांसमोर सद्यस्थितीत ३0 प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रश्न गहन बनला आहे. जलसंपदा विभागाकडे २३ आणि अन्य महामंडळांकडे सात असे एकूण ३0 प्रकल्प सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी ठप्प आहेत. जिल्ह्यातील किनखेड, वडगाव, कुकसा, टनका, चाकातीर्थ, गोंडेगाव, जयपूर, कोकलगाव, उकळी, जुमडा, राजगाव, सोनगव्हाण, वाकद, ढिल्ली, वरूड, झोडगा, मिर्झापूर, कोयाळी, पांगराबंदी, आसेगाव, गणेशपूर, उमरी, वाडी रायताळ आणि पळसखेड या प्रमुख प्रकल्पांची सुधारित प्रशासकीय मान्यता पाटबंधारे विभागाकडे प्रलंबित आहे. जिल्ह्यात एक लाख २१ हजार ८९९ हेक्टरवर सिंचन होणे अपेक्षित आहे. सद्यस्थितीत ६८ हजार हेक्टरवर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. ३0 सिंचन प्रकल्प पुर्णत्वाकडे गेले तर शेतकर्यांचा सिंचनाचा प्रश्न बर्याच प्रमाणात निकाली निघणार आहे; मात्र या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठीच्या हालचालींना वेग नसल्याने किमान एक वर्षे तरी परिस्थिती ह्यजैसे थेह्ण राहण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. परिणामी, सिंचनाअभावी रब्बी हंगाम कोरडाच जाण्याची भीती कोरडवाहू शेतकर्यांमधून व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील ३0 प्रकल्प रखडले!
By admin | Published: November 05, 2015 1:38 AM