लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत सन २०१६-१७ या वित्तीय मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या ३० युवकांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे वाशिम जिल्हा व्यवस्थापक गजानन शेंडे यांनी दिली. यावर्षीदेखील युवक-युवतींना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत सन २०१७-१८ या वित्तीय वर्षात इतर मागासवर्गीय प्रवर्गातील २०० युवक व युवतींना ह्यसीपेटह्ण औरंगाबाद या प्रशिक्षण संस्थेत, सहाय्यक मशिन चालकाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ह्यसीपेटह्ण ही संस्था भारत सरकारचा उपक्रम असून त्याद्वारे प्लॅस्बीक इंजिनियरिंग व तंत्रज्ञानावर माहिती व प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यात येते. महामंडळाचे जिल्हा कार्यालयाकडून इतर मागासवर्गीय प्रवर्गातील इच्छूक युवक व युवतींकडून अर्ज मागविण्यात येत आहे. आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याचा शेवटचा ३० जून २०१७ अशी आहे. प्रशिक्षणाचा कालावधी ३ महिन्यांचा आहे. जिल्हा कार्यालयामार्फत पाठविण्यात आलेल्या अर्जानुुसार पात्र लाभार्थी निवड प्रशिक्षण संस्थेकडून मुलाखत घेवून करण्यात येईल. प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना नियमानुसार दरमहा १ हजार प्रशिक्षणार्थी शुल्क देण्यात येईल. इच्छूक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्य्वस्थापक गजानन शेंडे यांनी केले.
३० प्रशिक्षणार्थींना मिळाला रोजगार !
By admin | Published: May 26, 2017 7:14 PM