वाशिम : दरवर्षी दहावीच्या निकालानंतर पाॅलिटेक्निकसाठी अर्ज प्रक्रियेस सुरुवात केल्या जाते. यावर्षी विद्यार्थ्यांना कागदपत्र गाेळा करण्यासाठी वेळ मिळावा याकरिता आधीच ३० जूनपासून अर्ज प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला आहे. ३० जूनपासून आजपर्यंत १६ दिवसात १२८ जणांनी अर्ज भरल्याची माहिती वाशिम येथील पाॅलिटेक्निक काॅलेजचे प्राचार्य डाॅ. विजय मानकर यांनी दिली.
वाशिम जिल्ह्यात केवळ एकच पाॅलिटेक्निक काॅलेज असून या काॅलेजमध्ये एकूण ६ बॅच असून प्रत्येक बॅचमध्ये ६० असे एकूण ३६० विद्यार्थी क्षमता आहे. विविध अभ्यासक्रमांतर्गंत येथे शिक्षण दिल्या जात असून याकरिता अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला असला तरी अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामाेरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे. १६ जून राेजी दहावीचा निकाल लागला असल्याने आता या प्रवेश प्रक्रियेला गती येणार असल्याचे दिसून येत आहे. पूर्वी पाॅलिटेक्निकसाठी विदयार्थी माेठ्या प्रमाणात जायचे याचे प्रमाण काही वर्षांपासून कमी झाल्याचे दिसून येत असल्याने दरवर्षी काही ना काही प्रमाणात क्षमतेएवढे विद्यार्थी दिसून येत नाहीत. गतवर्षी २५ टक्के जागा रिक्त राहिल्या हाेत्या.
......
विद्यार्थ्यांकडे टीसी, जात प्रमाणपत्र नाही
दहावीचा निकाल लागल्यानंतर शाळेकडून विदयार्यांना टीसी (शाळा साेडल्याचे प्रमाणपत्र)देण्यात येते. परंतु निकालच १६ जुलै राेजी लागला. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांकडे टीसीच मिळालेली नाही.
अर्ज भरण्यासाठी जातीचे प्रमाणपत्रही सादर करावे लागत असल्याने बहुतांश विद्यार्थ्यांकडे हे प्रमाणपत्र नसल्याने ते काढण्याची लगबग करीत आहेत.
.....
निकाल लागला आता येणार गती
दहावीचा निकाल लागल्यानंतर पाॅलिटेक्निक अर्ज भरण्यासाठी दरवर्षी गती येते. याहीवर्षी दहावीच्या निकालानंतर गती येणार आहे. १६ जुलै राेजी निकाल लागल्याने यापुढे अर्जाची वाढ हाेण्याची शक्यता आहे.
अर्जासाठी विद्यार्थ्यांना शाळा साेडण्याचा दाखला लागताेय. म्हणून गती मंदावते.
....
विद्यार्थ्यांच्या अडचणी काय ?
पाॅलिटेक्निकसाठी जाण्याची इच्छा आहे, परंतु आजपर्यंत निकालच लागला नव्हता. १६ जुलै राेजी निकाल लागला. अर्जासाठी शाळा साेडल्याचा दाखला आवश्यक आहे. निकालाशिवाय शाळा हा दाखला देऊ शकत नाही. त्यामुळे अर्ज कसा भरावा.
- मानसी पाटील
विद्यार्थी, वाशिम
ऑनलाइन अर्ज भरतांना नेट कनेक्टिव्हिटीचा माेठा फटका बसत आहे. तासन्तास इंटरनेट कॅफेवर बसून रहावे लागत आहे. तसेच एक जरी प्रमाणपत्र कमी असेल तर अर्ज रद्द हाेऊ शकताे. माझ्यासह अनेक विद्यार्थ्यांकडे जातीचे प्रमाणपत्र नसल्याने अडचण येत आहे.
- रवि खानझाेडे
विद्यार्थी, वाशिम
.....
गेल्यावर्षी २५ टक्के जागा रिक्त
वाशिम येथील पाॅलिटेक्निक काॅलेजमध्ये एकूण विद्यार्थी क्षमता ३६० असून गतवर्षी यामधील २५ टक्के जागा रिक्त राहिल्या हाेत्या.
....
तंत्रशिक्षणचे संचालक डाॅ. अभय वाघ यांच्या विशेष प्रयत्नाने विद्यार्थ्यांना कागदपत्रे गाेळा करण्यात यावीत यासाठी दहावी निकालाआधीच अर्ज प्रक्रिया सुरू केली.
- डॉ. विजय मानकर,
प्राचार्य, पाॅलिटेक्निक काॅलेज, वाशिम