जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे आशादायी चित्र आहे. बुधवारी एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नसल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला. बुधवारी नव्याने ३२ रुग्ण आढळून आले तर ५४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्याबाहेरील ३ बाधिताची नोंद झाली आहे. मंगरूळपीर, मानोरा, कारंजा शहरात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. आतापर्यंत ४११३२ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४००१२ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंत ६०२ जणांचे मृत्यू झाले. नागरिकांनी यापुढेही आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाने केले.
००००
५१७ सक्रिय रुग्ण
बुधवारच्या अहवालानुसार नव्याने ३२ रुग्ण आढळून आले तर ५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण ५१७ रुग्ण सक्रिय आहेत.
000000000000
वाशिम, मालेगाव तालुक्यात प्रत्येकी ८ रुग्ण
बुधवारच्या अहवालानुसार वाशिम व मालेगाव तालुक्यात प्रत्येकी आठ रुग्ण आढळून आले. रिसोड शहरात तीन व ग्रामीण भागात तीन, कारंजा शहरात एक व ग्रामीण भागात दोन, मंगरूळपीर शहरात एक व ग्रामीण भागात एक तर मानोरा तालुक्यात दोन रुग्ण आढळून आले.