रिसोड: तालुक्यातील बाळखेड व कवठा येथे ३३ हजार रूपयांच्या चोरीची घटना १९ जानेवारीला रात्रीच्या सुमारास घडली. बाळखेड येथील दिनकर पल्हाड यांच्या घरातून १९ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी २५ हजार ८00 रुपयांचे धान्य चोरून नेले. चोरट्यांनी चोरून नेलेल्या मालामध्ये सोयाबीनचे तीन पोते, उडीदाचे एक पोते, ३0 किलो वजन असलेल्या मुगाच्या ६ बॅग व सोयाबीन बियाणेसह ३00 रूपये किमतीची केबल, असा एकूण २५ हजार ८00 रूपयांचा ऐवज चोरून नेला. तर दुसर्या घटनेत कवठा येथील एका मोबाइल रिपेअरिंगच्या दुकानाचे कुलूप तोडून ७ हजार ७00 रूपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. यात ४ हजार रूपये किमतीचा कॉम्प्युटर सीपीयू, २ हजार रुपयांचे सिलिंडर, २ मोबाइल हँडसेट, असा एकूण ७ हजार ७00 रूपयांचा ऐवज चोरीस गेला. दोन्ही चोर्या मिळून एकूण ३३ हजार ५00 रूपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरला. बाळखेड येथील दिनकर पल्हाड व कवठा येथील परमेश्वर कांबळे यांनी या प्रकरणाची फिर्याद रिसोड पोलिसांत दिली. याप्रकरणी पोलिसांनी बाळखेड प्रकरणात आरोपीविरुद्ध कलम ४५७, ३८0 तर कवठा येथील चोरी प्रकरणात अज्ञात आरोपीविरूद्ध कलम ४६१, ३८0 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
बाळखेड व कवठा येथे ३३ हजारांची चोरी
By admin | Published: January 21, 2015 1:26 AM