शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

एस. टी.च्या ३४० बसेसनी अर्ध्या रस्त्यातच सोडली साथ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 12:21 PM

State Transport News दोन वर्षांत एस. टी. महामंडळाच्या ३४० बसेस रस्त्यातच बंद पडल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : तांत्रिक बिघाड, पंक्चर होणे यासह अन्य कारणांमुळे गत दोन वर्षांत एस. टी. महामंडळाच्या ३४० बसेस रस्त्यातच बंद पडल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.जिल्ह्यात वाशिम, मंगरूळपीर, कारंजा व रिसोड असे चार आगार आहेत. वाशिम आगारामध्ये मालेगाव तालुक्याचा समावेश आहे. चार आगार मिळून १८९ बसेस असून, १० वर्षांवरील जवळपास ३२ बसेस आहेत. सुरक्षित प्रवासासाठी अजूनही अनेकजण महामंडळाच्या बसेसला प्राधान्य देतात. एस. टी. महामंडळाची खासगी प्रवासी वाहनाशी स्पर्धा असून, प्रवाशांची पळवापळवी होऊ नये म्हणून आगार परिसरातील २०० मीटरमध्ये खासगी प्रवासी वाहने उभी करण्यास मनाई आहे. आगार परिसरातील नो पार्किंग झोनमध्ये खासगी प्रवासी वाहने उभी करणाऱ्याविरूद्ध योग्य ती कारवाई करावी, यासंदर्भात पोलीस व वाहतूक शाखेकडे आगार प्रमुखांतर्फे पत्रव्यवहारही करण्यात येतो. खासगी प्रवासी वाहनांशी स्पर्धा करताना एस. टी. महामंडळाला काही प्रमाणात नादुरूस्त व जुनाट बसेसमुळे गैरसोयीला सामोरे जावे लागते. तांत्रिक बिघाड उद्भवणे, पंक्चर होणे, स्टेअरिंग जाम होणे आदी कारणांमुळे गत दोन वर्षांत चार आगार मिळून जवळपास ३४० बसेस रस्त्यातच बंद पडल्या. काही बसेस ‘दे धक्का’ या प्रकारातील असल्याने वाहकासोबतच प्रवाशांनादेखील संबंधित बसला धक्का देण्याची वेळ येते. शहरांसह ग्रामीण भागातही महामंडळाच्या बसेसमुळे दळणवळणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. खासगी प्रवासी वाहनाच्या तुलनेत सुरक्षित प्रवास असल्यामुळे महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करण्याला अनेक प्रवासी पसंती देतात. दुसरीकडे तांत्रिक बिघाड व अन्य कारणांमुळे रस्त्यातच बसेस बंद पडत असल्याने प्रवाशांना मनस्तापही सहन करावा लागतो. 

रस्त्यातच एस. टी. बंद पडण्याची कारणेअनेक बसेसची आयुर्मयादा संपत आल्याने तांत्रिक बिघाडामुळे अधूनमधून प्रवासादरम्यानच त्या बंद पडतात. तांत्रिक बिघाड निर्माण होणे, पंक्चर होणे, स्टिअरिंग जाम होणे, वायरिंगमध्ये दोष निर्माण होणे आदी कारणांमुळे रस्त्यातच काही बसेस बंद पडतात. या बसेस बंद पडल्यानंतर महामंडळाच्या दुसऱ्या बसमध्ये प्रवाशांना बसवून दिले जाते.

१० वर्षांवरील ३० बसेसवाशिम, रिसोड, कारंजा व मंगरूळपीर असे चार आगार मिळून जिल्ह्यात १८९ बसेस आहेत. यापैकी जवळपास ३० बसेस या १० वर्षांपूर्वी आगारात दाखल झालेल्या आहेत. जास्तीत जास्त १२ वर्षांपर्यंत बसचा वापर करता येतो. रिसोड आगारात आठ बसेस १० वर्षांपूर्वी दाखल झाल्या. 

वर्षाला आठ लाख रुपये एस. टी. मेन्टेनन्सलामहामंडळाच्या बसेसची नियमित देखभाल, दुरूस्ती करण्यात येते. यासाठी एका वर्षाला साधारणत: सात ते आठ लाख रुपये मेन्टेनन्सला खर्च येतो. चारही आगारात बसेसची दुरूस्ती करण्यात येते. दरम्यान, बसेसच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च अकोला येथील मुख्य कार्यालयातून होत असल्याने या संदर्भात अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याचे आगारप्रमुखांनी सांगितले. साधारणत: साठ ते आठ लाख रुपये खर्च येतो. 

रिसाेड आगारांतर्गत २०१८ मध्ये १२२ तर २०१९ मध्ये ११७ बसेस मार्गातच बिघाडामुळे बंद झाल्या होत्या. आगारात १० वर्षांवरील जवळपास आठ बसेस आहेत. बसेसची नियमित देखभाल दुरुस्ती करण्यात येते.-श्रीकांत जगताप, आगारप्रमुख, रिसोड

आगारनिहाय संख्यावाशिम    ५३कारंजा    ४५रिसोड     ४५मं.पीर     ४६

टॅग्स :washimवाशिमstate transportएसटी