वाशिम : रिसोड : पशुखाद्याच्या वाहतुकीच्या नावाखाली आंध्र प्रदेशमधून महाराष्ट्रात येत असलेला ३ कोटी ४५ लक्ष रुपये किमतीचा ११ क्विंटल ५० किलो गांजा विदर्भ व मराठवाड्याच्या सीमेवर रिसोड पोलिसांनी १८ ऑक्टोबर रोजी सेनगाव-रिसोड मार्गावरून जप्त केला हाेता. या प्रकरणातील आराेपिंना आज न्यायालयासमाेर हजर केले असता विद्यमान न्यायालयाने त्यांना ५ दिवसाची पाेलीस काेठडी सुनावली.रिसोडचे ठाणेदार सारंग नवलकार व त्यांच्या चमूला या गांजा प्रकरणाची गाेपिनय माहिती मिळाल्यावरुन पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अतिरिक्त पोलीस अधीक्षक गोरख भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सारंग नवलकार, पोलीस उपनिरीक्षक संतोष नेमणार, शिल्पा सुरगडे, सुशील इंगळे, गुरुदेव वानखडे, अनिल कातडे, भागवत कष्टे, संजय रंजवे, रमेश मोरे, साहेबराव मोकाळे, महावीर सोनुने, ज्ञानदेव पारवे आदींनी आंध्र प्रदेशमधून येत असलेला एम.एच. २८ बी.बी. ०८६७ क्रमांकाचा टाटा आयशर पकडण्यात आला. चाैकशीत या ट्रकमध्ये गांजा आढळून आल्याने आराेपी आरोपी गोटीराम गुरुदयाल साबळे रा. कुऱ्हा ता. मोताळा जि. बुलडाणा, सिद्धार्थ भिकाजी गवांदे रा. निमगवाण ता. नांदुरा, प्रवीण सुपडा चव्हाण व संदीप सुपडा चव्हाण, दोघेही रा. भानवतखेड ता. मोताळा अशा चारही आरोपींंना अटक करुन त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. १९ ऑक्टाेबर राेजी सर्व आराेपिंना २३ ऑक्टाेबरपर्यंत ५ दिवसाची पाेलीस काेठडी सुनावण्यात आली.
रिसाेड पाेलिसांनी १८ ऑक्टाेबर राेजी ३ काेटी ४५ लक्ष रुपयांचा ११ क्विंटल ५० किलाे गांजा जप्त केला. यातील आराेपिंना अटक करण्यात आली असून त्यांची चाैकशी करण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास रिसाेड पाेलीस स्टेशनचे ठाणेदार सारंग नवलकर यांचेकडे देण्यात आला आहे. या आराेपिंमार्फत मूळ आराेपीपर्यंत पाेहचून त्यांचा शाेध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.- बच्चन सिंहपाेलीस अधीक्षक, वाशिम