शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

३५ शाळांना शुल्क परतावा; पाच प्रस्तावांची फेरचौकशी !

By admin | Published: June 02, 2017 7:14 PM

वाशिम - खासगी शाळेत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश दिल्यानंतर, शुल्क परतावा मिळण्यासाठी ४० शाळांनी शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - खासगी शाळेत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश दिल्यानंतर, शुल्क परतावा मिळण्यासाठी ४० शाळांनी शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर केले. यापैकी ३५ शाळांना शुल्क परताव्याची रक्कम देण्यात आली तर पाच शाळांच्या प्रस्तावांची फेरचौकशी सुरू झाली.शिक्षण हक्क कायद्यानुसार इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव कोट्यातून विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. या प्रवेशाचे शुल्क शासनाकडून संबंधित शाळांना वितरित केले जाते. यासाठी संबंधित शाळांकडून प्रस्ताव मागविले जातात. सन २०१४-१५ या शैक्षणिक सत्रात जिल्ह्यातील एकूण ४० शाळांनी शैक्षणिक शुल्काच्या प्रतीपूर्तीसाठी शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर केले होते. मध्यंतरीच्या कालावधीत शासनाकडून निधीच मिळाला नसल्याचे निधीचे वितरण होऊ शकले नाही. काही महिन्यांपूर्वी निधी प्राप्त झाल्याने निधीचे वितरण करावे, अशी मागणी संस्था चालकांनी शिक्षण विभागाकडे केली. दरम्यानच्या काळात संस्था चालकांनी जिल्हा परिषदेवर धडक देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील व शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांच्याशी चर्चा केली. चर्चेअंती पहिल्या शैक्षणिक सत्रातील शुल्क संस्थाचालकांना तातडीने वितरित करण्याच्या सूचना गणेश पाटील यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना केल्या. दरम्यान, या प्रस्तावांची छानणी केली असता, ग्रामीण भागातील पाच शाळांनी शहरी भागापेक्षाही अधिक शुल्क दाखविल्याचे समोर आले. पुरेशा प्रमाणात भौतिक व अन्य सुविधा उपलब्ध नसतानाही, या शाळांनी शहरी भागातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांपेक्षाही जास्त शुल्क दाखविल्याने पाटील यांनी या शाळांच्या प्रस्तावांच्या फेरचौकशी करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले. त्यानुसार पाच शाळांच्या प्रस्तावांची फेरचौकशी केली जात असल्याचे शिक्षणाधिकारी मानकर यांनी सांगितले. उर्वरीत ३५ शाळांना सन २०१४-१५ या सत्रातील शुल्काचा परतावा बँक खात्यामार्फत करण्यात आल्याचेही मानकर यांनी स्पष्ट केले.