शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
3
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
4
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
5
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
6
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
7
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?
8
सरकारी भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत,सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
9
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
10
नवरा बायकोचं भांडण, एका 'OK' नं रेल्वेला ३ कोटींचा फटका; कोर्टातील अजब प्रकरण काय?
11
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
12
Shah Rukh Khan :"जीव वाचवायचा असेल तर कोट्यवधी रुपये द्या, अन्यथा..."; सलमाननंतर शाहरुख खानला धमकी
13
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
14
Girnar Parikrama 2024: 'या' पाच दिवसांतच गिरनारच्या जंगलात मिळतो प्रवेश; जेवढ्या यातना तेवढाच आनंद!
15
शरद पवारांवरील टीका 'मानसपुत्रा'च्या जिव्हारी; निषेध व्यक्त करत वळसे पाटलांनी खोतांना दिला इशारा
16
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
17
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
18
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
19
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
20
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...

जिल्ह्यातील ३५१ युवकांना मिळाला रोजगार

By admin | Published: May 18, 2017 1:17 AM

ग्रामीण कौशल्य विकास योजना : विनामुल्य प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानाचा एक भाग म्हणून राबविणाऱ्या येणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेंतर्गत गोरगरीब युवकांना तीन महिने विनामुल्य प्रशिक्षण मिळत आहे. या प्रशिक्षणातून रोजगारासाठी सक्षम ठरलेल्या जिल्ह्यातील ३१५ युवकांना गत वर्षभरात विविध क्षेत्रात रोजगार मिळाला आहे.महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्ती अभियानाचाच एक भाग म्हणून दीन दयाळ उपाध्याय - ग्रामीण कौशल्य विकास योजना ही महत्वाकांक्षी योजना शासनाने सुरू केली आहे. ग्रामीण भागातील १८ ते ३५ वयोगटातील युवकांची मुळात असलेल्या कौशल्याची कार्यक्षमता वाढवून त्यांना विविध संघटीत क्षेत्रात वेतनी रोजगार उपलब्ध करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ग्रामीण भागातील दारिद्र्य निर्मुलन करण्याबरोबरच दहावी उत्तीर्ण असलेल्या गोरगरीब युवक-युवतींना संघटीत क्षेत्रात वेतनी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हानिहाय उद्दिष्ट दिले जाते. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील युवक-युवती, स्वयंसहायता समूहाच्या सदस्यांच्या कुटुंबातील युवक-युवती किंवा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत १०० दिवस काम केलेल्या लाभार्थींचा मुलगा-मुलगी या योजनेसाठी पात्र आहेत. पात्र युवक-युवतींसाठी पंचायत समिती स्तरावर मेळावा घेऊन तीन महिने मुदतीच्या विनामुल्य प्रशिक्षणासाठी निवड केली जाते. वाशिम जिल्ह्यात रोजगार व प्रशिक्षण देण्यासाठी तीन संस्थांची निवड शासनातर्फे झाली असून, सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात ३१५ जणांना ‘रोजगार’ देण्याचे उद्दिष्ट होते. मंगरूळपीर पंचायत समितीने सर्वप्रथम पुढाकार घेत ११२ युवक-युवतींना प्रशिक्षित केले. या ११२ जणांनादेखील विविध संघटित क्षेत्रात वेतनी रोजगार मिळाला आहे. उर्वरीत २०३ युवक-युवती हे पाच पंचायत समिती क्षेत्रातील आहेत. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाला सुरूवात होत नाही; तोच मंगरूळपीर पंचायत समितीने मेळावा घेऊन ५८ युवक-युवतींची प्रशिक्षणासाठी निवड केली. या सर्वांना तीन महिने विनामुल्य प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षणानंतर विविध संघटित क्षेत्रात वेतनी रोजगार मिळेल, अशी माहिती मंगरूळपीर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (पंचायत) भाऊसाहेब बेलखेडकर यांनी दिली. असे आहे तीन महिने विनामुल्य प्रशिक्षणग्रामीण भागातील पात्र युवक-युवतींना शासनातर्फे तीन महिन्यांचे विनामुल्य प्रशिक्षण दिले जाते. इंग्रजीसह मु्ख्य भाषेचे पायाभूत ज्ञान, युवकांमधील विविध कौशल्य क्षमतेचा विकास करणे, क्षमता बांधणी, संभाषण कौशल्य, व्यावहारिक ज्ञान आदींसंदर्भात दोन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते. एक महिन्याचे प्रशिक्षण हे संबंधित संघटित क्षेत्रातील कंपनीमध्ये ‘आॅन दि स्पॉट’ या पद्धतीने दिले जाते. या प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च शासनातर्फे केला जातो. या प्रशिक्षणातून पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ३१५ जणांना वेतनी रोजगार मिळाला आहे.