00
निर्जंतुकीकरणासाठी निधी अपुरा !
वाशिम : गतवर्षी कोरोनाकाळात ग्रामीण भागात निर्जंतुकीकरण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने भरघोस निधी ग्रामपंचायतींना देण्यात आला होता. यंदा मात्र निधी देताना जिल्हा परिषदेने हात आखडता ठेवला असल्याने ग्रामपंचायतींमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
०००००
ग्रामीण भागात रोजगाराची स्थिती गंभीर
वाशिम : शेतीची कामे संपल्याने आणि कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने ग्रामीण भागात रोजगाराची स्थिती गंभीर होत आहे. कोरोनावर मात केल्यानंतरही अनेक मजुरांना काम मिळत नसल्याची स्थिती ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे.
00
हिंगोली मार्गावरील उड्डाणपुलाचे काम ठप्प
वाशिम : हिंगोली-वाशिम महामार्गावर रेल्वे गेटनजीक गेल्या वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आलेले उड्डाणपुलाचे काम सद्य:स्थितीत ठप्प झाले आहे. यासाठी झालेल्या खोदकामाचा वाहनचालकांना त्रास होत आहे.
००००
दापुरी कॅम्प येथे सात कोरोना रुग्ण
वाशिम : रिसोड तालुक्यातील दापुरी कॅम्प येथे सात जणांचा कोरोना चाचणी अहवाल २० एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. आरोग्य विभागाने कॅम्प गाठून बुधवारी कोरोनाबाधितांच्या संपर्कातील नागरिकांची तपासणी केली.
०००००