जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले असून, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या देखील वाढत असल्याचे चित्र आहे. बुधवारी नव्याने १७ रुग्ण आढळून आले तर ३९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. कारंजा तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. रिसोड तालुक्यात ५, वाशिम तालुक्यात २, मंगरूळपीर तालुक्यात ४, मालेगाव तालुक्यात ३, मानोरा तालुक्यात ३ असे रुग्ण आढळून आले. आतापर्यंत ४१,४१४ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४०,६०७ रुग्णांनी कोरोनावर मात केली.
००००
१८७ सक्रिय रुग्ण
बुधवारच्या अहवालानुसार नव्याने १७ रुग्ण आढळून आले तर ३९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृह विलगीकरणात असे एकूण १८७ रुग्ण सक्रिय आहेत.
000000000000
वाशिम शहरात एक रुग्ण आढळला
बुधवारच्या अहवालानुसार वाशिम शहरात एक तर ग्रामीण भागात एक रुग्ण आढळून आला. रिसोड शहरात एक तर ग्रामीण भागात चार रुग्ण, मालेगाव शहरात एक तर ग्रामीण भागात दोन रुग्ण, मंगरूळपीर शहरात एक तर ग्रामीण भागात तीन रुग्ण, मानोरा शहरात एक तर ग्रामीण भागात दोन रुग्ण आढळून आले.