लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रिसोड तालुक्यातील केनवड उपकेंद्रातील जवळपास १० विद्युत रोहित्र नादुरूस्त असल्याने याचा फटका शेतकºयांना बसत आहे. याकडे महावितरणने लक्ष द्यावे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच प्रदीप पाटील मोरे यांच्यासह शेतकºयांनी २९ नोव्हेंबर रोजी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदनाद्वारे दिला.सध्या रब्बी हंगामाला सुरूवात झाली आहे. सिंचनासाठी शेतकºयांना विजेची नितांत गरज असताना केनवड सर्कलमधील वीजपुरवठा यंत्रणेचा पुरता बोजवारा उडत आहे. केनवड येथील उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंतादेखील गत दोन महिन्यांपासून अनियमित येत असल्याने समस्या निकाली काढल्या जात नाहीत, असा आरोप कळमगव्हाणचे सरपंच प्रदीप पाटील मोरे यांनी अधीक्षक अभियंता व्ही.बी. बेथारिया यांच्याशी चर्चा करताना केला. केनवड उपकेंद्रावरून होणारा वीजपुरवठा अनियमित झाल्याने याचा फटका शेतकºयांसह सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. केनवड उपकेंद्रातील पाच पेक्षा अधिक विद्युत रोहित्र बंद अवस्थेत असल्याने शेतकºयांसह नागकिांची गैरसोय होत आहे. सदर समस्या तातडीने निकाली काढावी तसेच कनिष्ठ अभियंत्यांची बदली करून अन्य अभियंत्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी मोरे यांच्यासह शेतकºयांनी केली. यावेळी अधीक्षक अभियंता बेथारिया यांच्याशी चर्चाही करण्यात आली. सदर समस्या निकाली निघाल्या नाही तर महावितरणच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.
केनवड उपकेंद्रातील १० विद्युत रोहित्र नादुरूस्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 4:26 PM